क्राईम

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – शिवभक्त शिष्टमंडळाची बैठक “खालिद का शिवाजी” प्रदर्शनाला स्थगिती;मुख्यमंत्र्यांनी दिली शिवभक्तांना हमी 


वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – शिवभक्त शिष्टमंडळाची बैठक
“खालिद का शिवाजी” प्रदर्शनाला स्थगिती;मुख्यमंत्र्यांनी दिली शिवभक्तांना हमी 
मुंबई प्रतिनिधी
“खालिद का शिवाजी” या वादग्रस्त चित्रपटाविरोधात शिवभक्त आणि मराठा संघटनांच्या भावना ऐकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील कुठेही प्रदर्शित होणार नाही, अशी हमी त्यांनी दिली आहे.
मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मराठा संघटना व शिवभक्तांच्या प्रतिनिधींची सविस्तर भेट घेतली. बैठकीत शिवभक्तांनी “खालिद का शिवाजी” या चित्रपटाविषयीची तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले की,
 “छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानाचे अस्मिता आहेत. त्यांच्या कर्तृत्व गौरवाशी चुकीची छेडछाड सहन केली जाणार नाही.”
मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक यांच्या हेतूची चौकशी होणार असल्याचे सांगितले. चुकीचे असल्यास कडक कारवाई होईल, असा इशाराही दिला.
या शिष्टमंडळात नामदार नरेंद्र पाटील, अभिजीत राणे, करण गायकर, अंकुश कदम, चेतन शेलार   व्यंकटेश मोरे,आशिष हिरे,नवनाथ शिंदे,सुभाष गायकर, पोपटराव देशमुख,रवी शिंदे,रमेश आंब्रे,प्रवीण पिसाळ भारत पिंगळे,कमलेश पिंगळे,सागर शेलार,निलेश शेलार निलेश गवळी,राजेश पवार,आनंद केदार,यश बच्छाव,अभिषेक जाधव,दत्तू जाधव,आनंद जाधव, सुरज बर्गे
तसेच इतर समाजबांधव व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या या ठाम भूमिकेनंतर चित्रपटाचे भवितव्य संपुष्टात येण्याची चिन्हं दिसत आहेत. आता या प्रकरणातील चौकशी आणि कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द ठाम निर्धारपूर्वक अंमलात आणला तर भविष्यात तथा कथित इतिहासकार आणि चित्रपट निर्मात्यांना चांगलाच अद्दलवजा संदेश मिळणार आहे. या निर्णयाने शिवभक्त आनंदीत झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *