मुरबाड ITI मध्ये पहिली इंडस्ट्री मीट – Dual VET प्रकल्पाला उद्योगांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुरबाड ITI मध्ये पहिली इंडस्ट्री मीट – Dual VET प्रकल्पाला उद्योगांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुरबाड प्रतिनिधी –
मुरबाड शासकीय ITI च्या सक्षमीकरणासाठी Siemens Ltd., Tata STRIVE आणि DVET यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच मुरबाड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (MMA) च्या सहकार्याने, दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी पहिल्या इंडस्ट्री मीट चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचा प्रमुख उद्देश स्थानिक उद्योगांना प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा आहे. बैठकीत Dual VET प्रकल्पाचे महत्त्व, प्रशिक्षण पद्धती आणि उद्योग क्षेत्रावरील सकारात्मक परिणाम यावर सखोल चर्चा झाली
या प्रसंगी MMA अध्यक्ष मुकेश उत्तमाणी, संयुक्त सचिव श्रीनिवास, कोषाध्यक्ष तुलसो, ITI मुरबाडचे प्राचार्य अनिरुद्ध जवारकर, ITI अंबरनाथचे प्राचार्य महेश जाधव उपस्थित होते. Siemens Ltd. आणि Tata STRIVE कडून प्रोजेक्ट मॅनेजर (पश्चिम व दक्षिण विभाग) रमेश भदवलकर, वरिष्ठ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर अक्षय अंजनकर तसेच प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर्स शंकर पंडित, जयेश पवार आणि नितीश सैंदाणे यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रम मुरबाड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, मुरबाड येथे पार पडला असून, स्थानिक उद्योगांसाठी ITI व Dual VET प्रकल्प एक महत्त्वाचा पूल ठरणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.