कल्पतरू पाठशाळेतर्फे वैदिक सन्मान सोहळा
कल्पतरू पाठशाळेतर्फे वैदिक सन्मान सोहळा
नाशिक :
नाशिक येथील कल्पतरू वेदपाठशाळेत गुरुपूजन व वैदिक सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त वेदमूर्ती घनपाठी सूर्यकांतशास्त्री राखे गुरुजी यांचा आणि तेजस क्षेमकल्याणी व जयेश कुलकर्णी यांना वेदविभूषण पदवी प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
पाठशाळेचे प्रमुख आचार्य वेदमूर्ती प्रसन्न तुंगार यांच्या हस्ते सूर्यकांतशास्त्री राखे यांचा पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आयुष्यभर वेदांची सेवा, वैदिक ज्ञानाचा प्रसार करणारे वैदिक सम्राट कै. श्रीकृष्णशास्त्री गोडसे गुरुजी आणि पाठशाळेचे संस्थापक वेदमूर्ती (घनपाठी) कै.
यशवंतशास्त्री पैठणे गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यशवंतशास्त्री पैठणे गुरुजींच्या पत्नी कल्याणी पैठणे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वेद अध्यायनाबरोबरच गायत्रीमंत्र उपासना करावी. त्यामुळे बुद्धिवर्धन होऊन बुद्धीला तेज प्राप्त होते, असे मार्गदर्शन राखे गुरुजींनी केले. कल्पतरू पाठशाळेत वैदिकज्ञान आणि कर्मकांड यांचे अध्ययन अखंड सुरू आहे त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. वेद रक्षणाची आणि अध्ययनची परंपरा अविरत जपली तर कै. यशवंतशास्त्री पैठणे गुरुजींना ती खरी श्रद्धांजली ठरेल.
असे मत त्यांनी व्यक्त केले. महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान संस्कृत शिक्षा बोर्ड उज्जैन (भारत सरकार) झाली.
या संस्थेमार्फत घेतल्या गेलेली सप्तम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल पाठशाळेचे विद्यार्थी तेजस क्षेमकल्याणी व जयेश कुलकर्णी यांना वेदविभूषण पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. इतर परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. पाठशाळेचे सुरेश दीक्षित, सुरेंद्र खरे, साईराज वाघमारे, मल्हार कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केली. संकेत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले, तर सिद्धेश उपासनी यांनी आभार मानले. या सोहळ्यास विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता