ठाणगाव भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा ; गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा ;
गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सिन्नर प्रतिनिधी
ठाणगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या74 या वाढदिवसानिमित्ताने गरजू 20 विद्यार्थ्यांना, शालेय साहित्य वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद काकड, भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका सघटण सरचिटणीस रामदास भोर, भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी सिन्नर तालुका अध्यक्ष, मोहन आव्हाड, विष्णुपंत पाटोळे , गुरुवर्य राजू काळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, कंपास पेटी, पेन ,पाणी बॉटल,वाटप करण्यात आले. यावेळी, विष्णुपंत पाटोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, आपल्या भारत देशाला, कर्तुत्ववान पंतप्रधान भेटले आहेत. त्यांनी आपल्या देशाला जगामध्ये आर्थिक दृष्टीने बळकट बनवण्याचे काम केले आहे.
ते शासनाच्या विविध योजना तळमळीने राबवत आहेत.या योजनांचा महिलांनी व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन विष्णूपंत पाटोळे यांनी केले.यावेळी भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस, रामदास भोर, भारती जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी सिन्नर तालुका अध्यक्ष, मोहन आव्हाड, विष्णुपंत पाटोळे, गुरुवर्य राजू काळे, अशोक काकड, शंकर आमले,गोरख जाधव, सुनील गोसावी,विश्वनाथ मंडोळ,तसेच असंख्य भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा जनसेवा सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात पार पडला