ताज्या घडामोडीसामाजिक

शांतीगिरीजी महाराजांच्या वतीने  शहरात मतदार जनजागृती रॅली 


शांतीगिरीजी महाराजांच्या वतीने 

शहरात मतदार जनजागृती रॅली 

 

हजारोंच्या संख्येने मोटरसायकलस्वारांचा सहभाग…

 

नाशिक : प्रतिनिधी

निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील विविध भागातून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मतदार जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली.रॅलीत हजारो मोटारसायकलस्वार सहभागी झाले होते. नागरिकांच्या वतीने महाराजांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले.

Advertisement

आडगाव येथील श्री मारुती मंदिर येथे महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करून मतदार जनजागृती साठी मोटरसायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. रॅली आडगाव-जत्रा हॉटेल-नांदूर नाका-जेल रोड-नाशिक रोड-विजय ममता-मुंबई नाका-इंदिरानगर-पाथर्डी फाटा-नम्रता हॉटेल-सिम्बॉयसिस कॉलेज-उत्तम नगर-पवन नगर-त्रिमूर्ती चौक-आयटीआय मार्गे सातपूर-पाईपलाईन रोड-गंगापूर रोड-रामकुंड या मार्गे संपन्न झाली.रामकुंड येथे शांतीगिरीजी महाराजांच्या शुभहस्ते ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात गंगापूजन संपन्न झाले. गंगा आरती व श्री जगदगुरू जनार्दन स्वामींच्या महाआरतीने तसेच प्रदोष पर्वकालावर सत्संग,नामजप होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदार जनजागृती व्हावी यासाठी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या वतीने मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.रॅलीत हजारो मोटरसायकलस्वारांनी उपस्थिती लावली. देशभक्तीच्या एका विचाराने प्रेरित होऊन रॅलीत एकाच ड्रेस कोडवर बहुतांशी भाविक सहभागी झाले होते.प्रत्येक मोटरसायकलवर धर्मध्वज,एक बॅनर त्यावर मतदार राजा जागा हो,शंभर टक्के मतदान झालेच पाहिजे,सत्पात्री मतदान करा,लढा राष्ट्र हिताचा,संकल्प शुद्ध राजकारणाचा,चांगल्या व्यक्तींनी राजकारणात यावे.. यांसह विविध बोधात्मक बॅनर होते. शहरातील चौका-चौकात शांतिगिरीजी महाराजांचे पुष्पहार,पुष्पगुच्छ देऊन नागरिकांनी पूजन केले.तसेच फटाक्यांचीआतिषबाजी, पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले.जास्तीतजास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन स्वामी शांतीगिरीजी महाराज व जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *