गणेशाला निरोप देतांना वालदेवी नदी पात्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
गणेशाला निरोप देतांना वालदेवी नदी पात्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
नाशिक प्रतिनिधी
पाथर्डी शिवारातील नांदूर रस्ता भागातील वालदेवी नदी पात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या पाथर्डी फाटा भागातील म्हाडा कॉलनी मधील ओंकार चंद्रकांत गाडे आणि स्वयंम मोरे या दोघा युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मित्रांसोबत हे दोघे गणेश विसर्जनासाठी गेले होते. नदीपात्रात असलेल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यात हे दोघे पडले. ओंकार केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण घेत होता,तर स्वयं संदीप फाऊंडेशन मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. स्वयंचे वडील माजी सैनिक असून त्याला एक बहीण आहे तर ओंकारचे वडील खाजगी कंपनीत नोकरीला आहेत शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाठ ,माजी नगरसेवक भगवान दोंदे ,धनंजय गवळी मदन डेमसे आदींनी घटनास्थळी जाऊन अग्निशामक दलाला सहकार्य केले .एका तासानंतर या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले .वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला.