क्राईम

सप्तश्रृंगी गडावर भीषण दुर्घटना; इनोव्हा १००० फूट खोल दरीत कोसळली, सहा भाविकांचा मृत्यू


सप्तश्रृंगी गडावर भीषण दुर्घटना; इनोव्हा १००० फूट खोल दरीत कोसळली, सहा भाविकांचा मृत्यू

वणी–प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील गणपती घाटात आज दुपारी अत्यंत भीषण अपघात घडला. एमएच १५ बीएन ०५५५ क्रमांकाची इनोव्हा कार सुमारे १००० ते १२०० फूट दरीत कोसळल्याने पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातही प्रवासी दर्शनासाठी गडाकडे जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटले. घाटातील पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या तीव्र वळणाजवळ वाहन वेगामुळे घसरून खोल दरीत कोसळले. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठा आवाज ऐकून संताप व भीती व्यक्त करत घटनास्थळी धाव घेतली.

Advertisement

सध्या दरीत पडलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, काही मृतदेह अतिशय खोल भागात अडकल्याने बचावकार्याला विलंब होत आहे. स्थानिक नागरिक, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकांनी घटनास्थळी दाखल होऊन युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे.

या घाटातील संरक्षणभिंती व काठाडे अनेक ठिकाणी तुटलेले असल्याची चर्चा असून, गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून घाटामधील कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. यामुळेच वाहन थेट संरक्षणभिंत तोडून दरीत कोसळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अपघाताचे अचूक कारण अद्याप स्पष्ट नसले तरी घाटातील असुरक्षित कामे, काठाड्यांची दुर्दशा व वेग हे घटक लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीच्या तपासणीची मागणी केली आहे.

घटनेमुळे सप्तश्रृंगी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अपघातातील दुर्दैवी मृत:

चालक: किर्ती पटेल 50

रशिलापटेल 50

विठ्ठल पटेल 65

लता पटेल 60

पचन पटेल 60

मनी बेन पटेल 70


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *