क्राईम

नाशिक मधील गृह खरेदीचा ट्रेंड-  वन ,टू व थ्री बीएचके या पारंपरिक सदनिकांसोबतच ग्राहकांचा कल फोर-फाइव्ह बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे शेल्टरच्या तिसऱ्या दिवशी लोटली अभूतपूर्व गर्दी


नाशिक मधील गृह खरेदीचा ट्रेंड- 

 

वन ,टू व थ्री बीएचके या पारंपरिक सदनिकांसोबतच ग्राहकांचा कल फोर-फाइव्ह बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे

 

शेल्टरच्या तिसऱ्या दिवशी लोटली अभूतपूर्व गर्दी

 

 

नाशिक -प्रतिनिधी

 

पहिले घर तसेच सध्या आहे त्यापेक्षा मोठे घर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिवाराचा विस्तार तसेच उत्पन्नामध्ये झालेली वाढ यामुळे हा ट्रेंड बघायला मिळत असून वन , टू व थ्री बीएचके या पारंपरिक सदनिकांना असलेल्या मागणी सोबतच आता ग्राहकांचा कल फोर-फाइव्ह बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंट या कडे देखील वळल्याचा दिसून येत असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली .

 

क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे 20 ते 25 डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील पी. टी .सी समोरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर -2024 या गृहप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने नाशिक मधील गृह खरेदीचा नवा ट्रेण्ड यावर त्यांनी प्रकाश टाकला.

 

ते पुढे म्हणाले की नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यामधून शिक्षणासाठी नाशिकला अनेक विद्यार्थी येत आहेत आपल्या मुलाला हॉस्टेलमध्ये ठेवण्यापेक्षा नाशिकमध्ये स्वतःचा फ्लॅट असावा ज्याने मुलांची चांगली सोय होईल सोबत भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक होईल अश्या विचाराने देखील गृह खरेदी होत आहे .या सोबतच गेटेड टाऊनशिप , विविध अॅमिनिटीज, स्टुडंट हौसिंग, सीनियर सिटीझन हौसिंग असे अनेक पर्याय देखील उपलब्ध असून, त्यांना मागणीही वाढत आहे असेही ते म्हणाले

Advertisement

 

शेल्टर -2024 चे समन्वयक गौरव ठक्कर यांनी क्रेडाई सदस्य असलेल्या बांधकाम व्यवसायिकांकडं कडून प्रॉपर्टी घेण्याचे काही प्रमुख फायदे विशद केले ते म्हणाले गेल्या काही वर्षांपूर्वी लागू केलेला रेरा हा कायदा ग्राहकाभिमुख आहे. परंतु रेरा कायदा लागू करण्याच्या आधीच क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे सर्व सदस्यांसाठी मॉडेल कोड ऑफ कण्डक्ट लागू केले गेले होते. यामध्ये ग्राहकाभिमुख विविध मुद्दे अधोरेखित केले आहेत .यामुळे क्रेडाई नाशिक मेट्रो सदस्य म्हणजेच विश्वासाहर्ता असे समीकरण रूढ झाले आहे आणि यामुळेच क्रेडाई आयोजित शेल्टर 2024 ला मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्स्फूर्त असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, कृषीपूरक व्यवसाय, निर्यात तसेच इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात वाढत असलेल्या नाशिकमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षात रस्ते, हवाई तसेच रेल्वे द्वारे नाशिक ची देशभरात कनेक्टीवीटी वाढली आहे. नाशिक जिल्ह्या सोबतच खानदेशातून देखील मोठ्या प्रमाणात नाशिक मध्ये उज्वल भविष्यासाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढली असून समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजीनगर तसेच मुंबई शहरे देखील अधिक जवळ आली असल्याने तेथील गाहकांचा ओघ पण नाशिक कडे वाढला असल्याची माहिती शेल्टर -2024 चे मार्गदर्शक दीपक बागड यांनी दिली

 

प्रदर्शन कालावधीत रोज लकी ड्रॉ काढण्यात येत असून २० डिसेंबर चे विजेते असे ..

 

१.वंदना पाटील २.अरविंद पाटील ३.उज्वल पाटील

४.अश्विनी के.५ राम नागरे ६.राजेंद्र निगळ

 

 

आज २३ रोजी संध्याकाळी ५ वाजता सेमिनार

 

विषय- यशस्वी होण्यासाठी प्रतिमा व्यवस्थापन. वक्ता – निधी वैश्य

 

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजॉय गुप्ता, जयंत भातांब्रेकर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋशिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज खिंवसरा, अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सह समन्वयक सुशांत गांगुर्डे, वृषाली महाजन,सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *