युवा-विज्ञान प्रसारकांमार्फत होतोय वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत
युवा-विज्ञान प्रसारकांमार्फत होतोय वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत
नाशिक प्रतिनिधी
शालेय शिक्षणासोबतच बालवयात हसत खेळत विज्ञानाच्या माध्यमातून वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्याचा ‘शनिवारी विज्ञानवारी” हा स्तुत्य उपक्रम मराठी विज्ञान परिषद मुंबई मध्यवर्ती द्वारे महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे.नाशिकमधील मराठी विज्ञान परिषद नाशिक विभाग आणि क्रां.व्ही.एन.नाईक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मागील वर्षीपासून या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे.सदरील उपक्रमाद्वारे शालेय शिक्षण संपून महावियालयीन शिक्षणासाठी क्रां.व्ही.एन.नाईक महाविद्यालयात प्रवेश घेतलेले प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील निवडक विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग सादरीकरणाचे प्रशिक्षण दिले जाते आणि नाशिक शहरातील निवडक शाळांमध्ये या प्रशिक्षित युवा विज्ञान प्रसाराकांमार्फात शालेय विद्यार्थ्यांना सहज सोपे विज्ञानातील प्रयोग, त्यातील क्लिष्ट संकल्पना रंजक पद्धतीने समजावून सांगितल्या जातात.या उपक्रमामध्ये प्रथम वर्षी प्रवेशित झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील आपल्या विषयांशी निगडीत मुलभूत विज्ञानाबद्दल आपसूक गोडी निर्माण होऊन,त्यातील परिणामकारक सादरीकरण,सभाधीटपणा, व्यक्तीमत्व विकास इ.चे धडे गिरविण्याची संधी निर्माण झाली असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विज्ञान परिषदेचे नाशिक विभाग समन्वयक गणेश बागुल,कार्यवाह अजित टक्के आणि संपूर्ण कार्यकारी मंडळ,नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सानप,विज्ञानमंडळ प्रमुख डॉ.हेमेंद्र शिंदे,डॉ.विजय नौकुडकर, उपप्राचार्य दिलीप कुटे,प्रा.डॉ.पौर्णिमा बोडके यांचे सहकार्य व पाठबळ लाभत आहे.