जिल्हा स्पेशल ऑलम्पिक मध्ये डॉ. ओहरा मतिमंद विद्यालयाचे घवघवीत यश
जिल्हा स्पेशल ऑलम्पिक मध्ये डॉ. ओहरा मतिमंद विद्यालयाचे घवघवीत यश
संगमनेर (प्रतिनिधी)–
काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व मा आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरलेल्या संग्राम संचलित डॉ देवेंद्र ओहरा मतिमंद विद्यालयाने अहमदनगर जिल्हा स्पेशल ऑलम्पिक (मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा) मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला असल्याची माहिती प्राचार्य चांगदेव खेमनर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना खेमनार म्हणाले की स्पेशल ओलंपिक भारत सरकार ,अहमदनगर जिल्हा क्राफ्ट अँड आर्ट संगीत गायन स्पर्धा लोणी येथे संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये संगमनेरच्या डॉ ओहोरा मतिमंद विद्यालयातील विद्यार्थी कुणाल सहाने यांनी गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक ,तर पवन भोसले यांनी क्राफ्ट मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर तेजस भले याने क्राफ्ट मध्ये तृतीय क्रमांक आणि सार्थक गडगे यांनी चित्रकलेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना स्पेशल ऑलिंपिकच्या अध्यक्ष सौ धनश्री ताई विखे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक चांगदेव खेमनर ,श्री गोरे सर, विकास भालेराव , सौ शेलार मॅडम ,विक्रम यादव यांनी मार्गदर्शन केले.
या सर्व विद्यार्थ्यांचे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ नामदेवराव गुंजाळ यांचं सर्व संचालक मंडळांनी अभिनंदन केले आहे.