क्राईम

मद्य, गुटख्यासह ६४ लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त – ग्रामीण पोलिसांची कामगिरी


मद्य, गुटख्यासह ६४ लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त – ग्रामीण पोलिसांची कामगिरी

 

 

 

नाशिक प्रतिनिधी

Advertisement

 

विधानसभा निवडणुकीमुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायांविरूध्द धडक कारवाई सुरू केली असून आचारसंहिता लागु झाल्यापासून मद्यसाठा, गुटखा यासह ६४ लाख ३४ हजार २७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांनी केलेल्या सुचनेनुसार ग्रामीण भागात अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सुरू आहे. अतिदुर्गम डोंगराळ भागात गावठी दारू तयार करणे अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्या १३१ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच १२ लाख,५० हजार, ४०८ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. वणी पोलीस ठाणे हद्दीत विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने अंकलेश्वरहून मालवाहू वाहनात शेतीकामासाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्यांमध्ये लपवून गुटख्याची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली. यामध्ये २३ लाख,४० हजार रुपयांचा गुटखा आणि मालवाहतूक वाहन असा ४३ लाख, ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मालेगावजवळील पवारवाडी परिसरात आणि इतर ठिकाणी गुटखा वाहतूकसंदर्भात सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यात पाच लाख, ४५ हजार ८६९ रुपयांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा आठ लाख, ५३ हजार ८६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तीन दिवसांच्या कारवाईत ६४ लाख, ३४ हजार २७७ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *