सिडकोच्या दत्त मंदिर चौकात दुचाकी जळाली
सिडकोच्या दत्त मंदिर चौकात दुचाकी जळाली
सिडको प्रतिनिधी
सिडको त्रिमुर्तीचौक दत्तमंदिर चौकात मंगळवारी रात्री,दुचाकीला अचानक आग लागली . आगीचे वृत्त कळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरीत आग विझविली .
सिडको त्रिमुर्तीचौक दत्तमंदिर चौकात मंगळवारी, रात्री विशाल पेट्रोल पंपासमोर रस्त्यावर स्प्लेंडर गाडी टू व्हीलर (एमएच १५ डिएफ ४८०१ ) तिला भर रस्त्यावर आग लागली असता,तात्काळ सिडको अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचून आग विझवून यशस्वीरित्या कार्य पूर्ण केले.लीडिंग फायरमन ए ए पटेल . आबा देशमुख, ट्रेनी फायरमन पी एस शिंदिकर,एस बी नांद्रे . एस एस जोशी, वाहन चालक नंदू व्यवहारे आदिनी आग विझविली.
घटना स्थळी नागरिकांनी गर्दी केली होती .