क्राईम

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने करण गायकर यांचे नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व मधून उमेदवारी अर्ज दाखल


मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने करण गायकर यांचे नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व मधून उमेदवारी अर्ज दाखल

 

 

 

नाशिक प्रतिनिधी

मराठा समाजाचे युवा नेते आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी छावा क्रांतिवीर सेनेच्या संस्थापक अध्यक्ष या नात्याने नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.हे पाऊल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशावरून उचलण्यात आले असून, मराठा समाजाच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी एक नवा संकल्प घेऊन पुढे जाण्याचा निर्धार यावेळी करण गायकर यांनी व्यक्त केला.

Advertisement

 

करण गायकर यांनी नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत मराठा समाजातील अनेक प्रतिष्ठित बांधव, तरुण कार्यकर्ते आणि समाजातील विविध घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या ऐतिहासिक क्षणी समाजबांधवांच्या जोशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि मराठा समाजाची एकजूट या घटनेतून दिसून आली.

यावेळी करण गायकर यांनी आपल्या संबोधनात मराठा समाजाच्या हक्कांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याचा संकल्प व्यक्त केला आणि सांगितले की, “आता वेळ आली आहे की मराठा समाजाला योग्य न्याय मिळावा, समाजाचे प्रश्न सुटावे आणि समाजाचे हक्क प्रस्थापित व्हावेत.ही लढाई आमच्या हक्कांची आहे आणि ती शेवटपर्यंत लढत राहू.”

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे अनेक आंदोलन आणि न्यायाच्या लढाया करण गायकर यांनी राबवल्या आहेत.त्यांचा हा उमेदवारी अर्ज समाजाच्या न्याय आणि हक्कांच्या लढाईचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *