शेतकरी व मराठा आंदोलक नाना बच्छाव यांचा नांदगावला अपक्ष अर्ज दाखल ; प्रस्थापितांसमोर उभे ठाकले आव्हान
शेतकरी व मराठा आंदोलक नाना बच्छाव यांचा नांदगावला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल ;
प्रस्थापितांसमोर उभे ठाकले आव्हान
नाशिक :प्रतिनिधी
नाशिकच्या शिवतीर्थावरील मराठा आरक्षणातील मुख्य आंदोलक नाना बच्छाव यांनी आज दि २९ ऑक्टोबर २०२४ रोजी नांदगाव विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारी साठी अर्ज दाखल केला,मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांना आपला परिचय अर्ज सादर केल्यावर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाना बच्छाव यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी यांना सादर केला. काही दिवसात मराठा आंदोलक जरांगे पाटील एकाच मतदार संघात एका पेक्षा अधिक उमेदवारा पैकी एक उमेदवार कोण? हे ठरवणार आहेत. त्यादिवशी बाकी अपक्ष मंडळी ठरलेल्या उमेदवाराला पाठिंबा देऊन अर्ज माघारी घेणार आहेत.
दरम्यान नांदगाव सारख्या दुष्काळी ग्रामीण भागातून नाना बच्छाव यांचा शेतकरी आंदोलनातील प्रवास आहे, हिंगणदेहेरे गावात माजी सरपंच म्हणूनही नानाने यशस्वी कामकाज केलं, आपले पद वर्षात दुसऱ्या सदस्यास दिले,गेल्या दोन दशका पासून नाना शेतकरी संघटना, शेतकरी समन्वय समितील अनेक आंदोलनात सक्रिय आहेत. जिल्हा बैंकेच्या कर्जमुक्ती आंदोलनात, तसेच शेतकरी संपात, दूध भाव आंदोलनात नाना बच्छाव यांचेवर अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच दुध आंदोलनात दोन महिने कारावास भोगला.तसेच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवतीर्थ येथे झालेल्या मराठा आंदोलनातील नानाने केलेले १०५ दिवसाचे मराठा आरक्षणासाठी उपोषण,अन्नत्याग यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यात नानाने झोकून समर्पित पणे कार्य केले आहे,शेतकरी वाचवा अभियानात राज्यभर शेतकरी आत्महत्या थांबवन्यासाठी शेतकरी संवाद सभा घेतल्या, कित्येक कर्जबाजारी, नापिकी, नैसर्गिक आपती आलेल्या नैराश्य ग्रस्त शेतकरी व शेतकरी कुटुंबाना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढले,तर आत्महत्या ग्रस्त कुटुंबाना सहाय्य व अधिकार मिळवून देण्याचे कार्य अनेक वर्षे केले आहे.
त्यासोबत मराठा आंदोलनात ओबीसीसह अनेक जाती समुदायांचा मराठा आंदोलनात सहभाग जोडला, हजारो संस्था, समुदाय यांचे पाठिंबा पत्रे घेतली,नाशिकच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या ऐतिहासिक रॅलीच्या संयोजनात नाना बच्छाव यांची धावपळ सर्व श्रुत असल्याचे सकल मराठा समाजाचे प्रवक्ते राम खुर्दळ यांनी सांगितले.
दरम्यान यंदा मराठा क्रांती योद्धा सांगेल त्या उमेदवारास मदत करण्याच्या हेतूने यंदाची नांदगावं विधानसभा नाना बच्छाव या लढाऊ उमेदवारामुळे प्रस्तापितांना घाम फोडल्याशिवाय राहणार नाही,असे मराठा महासंघाचे चंद्रकांत बनकर, मराठा आंदोलक करण गायकर,संभाजी बिग्रेडचे तथा मराठा आंदोलनातील प्रफुल्ल वाघ, नितीन रोटे पाटील,श्रीराम निकम,चंद्रकांत बच्छाव संदिप कुंटे पाटील यांनी सांगितले.
फोटो :मराठा आंदोलक,शेतकरी लढ्यातील नाना बच्छाव यांनी नांदगावं येथील निवडणूक अधिकारी यांना अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला