12 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश :मीरा भाईंदर पोलिसांची तेलंगणात कारवाई..13 जण ताब्यात, आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग
12 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश :मीरा भाईंदर पोलिसांची तेलंगणात कारवाई..13 जण ताब्यात, आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग
मीरा भाईंदर प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर पोलिसांनी तेलंगणात धडक कारवाई करत तब्बल ३२ हजार लिटर कच्चा एमडी (मेथॅम्फेटामाइन) जप्त केला आहे. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल १२ हजार कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
Advertisement
ही कारवाई भारतातील सर्वात मोठ्या ड्रग्ज जप्तींपैकी एक ठरत आहे. सुरुवात केवळ २०० ग्रॅम एमडी (२५ लाख रुपये किंमतीचा) जप्त करून झाली होती. मात्र, त्यातून उलगडत उलगडत संपूर्ण जाळे समोर आल्याची माहिती पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी माध्यमांना दिल
या प्रकरणी आतापर्यंत १३ आरोपींना अटक झाली असून पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी गटाशी असलेले संबंध तपासले जात आहेत.



