८ तासांत गुन्ह्याचा छडा ; अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी
८ तासांत गुन्ह्याचा छडा ; अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी
सिडको प्रतिनिधी :
अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केवळ ८ तासांत खून आणि जबरी चोरीप्रकरणी चार आरोपींना जेरबंद केले. या प्रकरणात दोन आरोपींसह दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश असून, त्यांनी एका तरुणाची हत्या करून पलायनासाठी मोटारसायकल चोरी केली होती.
दि. १३ मार्च रोजी संध्याकाळी सुमित सुनिल देवरे (२०, रा. अंबड, नाशिक) याच्यावर जुना वाद उकरून धारदार शस्त्राने वार करण्यात आले. आरोपींमध्ये अरुण वैरागर, प्रसाद रेवगडे व त्यांच्या दोन साथीदारांचा समावेश होता. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला
गुन्ह्याचा तपास करताना, आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र, पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने अहोरात्र प्रयत्न करून आरोपींचा माग काढला. मुंबई-आग्रा हायवेवरील राणे नगर येथे चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पो.नि. सुनिल पवार, पो.नि. जयंत शिरसाठ, पो.उ.नि. झनकसिंग घुनावत, पोलीस उपनिरिक्षक नितीन फुलपगारे, पोलीस उपनिरिक्षक संदेश पाडवी, पो.ह. उमाकांत टिळेकर, राहुल जगझाप, मयुर पवार, तुषार मते, स्वप्निल जुंद्रे, सागर जाधव, प्रविण राठोड, अनिल गाढवे, सचिन करंजे, समाधान शिदि, संदिप भुरे, दिपक निकम, योगेश सिरसाठ, आजिनाथ बारगजे, विष्णु जाधव, गणेश कोठुळे, संदिप डावरे यांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल पवार आणि त्यांच्या टीमने ही मोहीम यशस्वी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल पवार करीत आहेत.