क्राईम

कारडा कन्स्ट्रक्शनच्या आतताईपणाचा कर्मयोगी नगरच्या स्थानिकांना फटका  खोदकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप, वीज पुरवठा खंडीत, वाहतुकीची कोंडी   बांधकाम विभागाची साळसूद नरो वा कुंजरो भूमिका 


  1. कारडा कन्स्ट्रक्शनच्या आतताईपणाचा कर्मयोगी नगरच्या स्थानिकांना फटका 
  2. खोदकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप, वीज पुरवठा खंडीत, वाहतुकीची कोंडी 
  3.  बांधकाम विभागाची साळसूद नरो वा कुंजरो भूमिका 

नविन नाशिक प्रतिनिधी

नाशिक शहर आणि शहरातील रस्ते ही आपलीच मालमत्ता आहे या अविर्भावात काही बांधकाम व्यावसायिक वावरत असून महापालिका प्रशासन देखील या अविर्भावाला तटस्थपणे पाठीशी घालत असल्याने अशा निवडक व्यवसायिकांची बाउन्सरच्या मदतीने मुजोरी वाढत असल्याचे चित नविन नाशिकमधील कर्मयोगी नगर मध्ये पहायला मिळाले.

खरं तर नाशिक शहराच्या चौफेर विकासात बांधकाम व्यवसायिकांचा मोलाचा सहभाग आहे.या शहराचा खऱ्या अर्थाने विकास व्हावा यासाठी शहरातील छोटे मोठे अनेक बांधकाम व्यावसायिक प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. अशा काही सन्माननीय बांधकाम व्यवसायिकांचा अपवाद वगळल्यास शहराला वेठीस धरणाऱ्या काही निवडक बांधकाम व्यवसायिकांच्या आततायी मुजोरीचा स्थानिक नागरिकांना फटका तर बसतोच शिवाय बांधकाम व्यवसायातील प्रामाणिक व्यवसायिकांनाही आपल्या व्यावसायिक बंधुच्या कष्टाने उभ्या केलेल्या प्रतिष्ठेलाही धक्का बसतो.असाच काहीसा प्रकार नविन नाशिकमधील कर्मयोगी नगरच्या स्थानिक नागरिकांच्या वाट्याला आला. विशेष म्हणजे या प्रकरणात शहरातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक पण नेहमीच चर्चेत असलेल्या बांधकाम व्यावसायिक कारडा कॅन्स्ट्रक्शन यांचे नाव चर्चेत आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य बाउन्सरच्या मदतीने स्थानिक नागरिकांवर दादागिरीने आणखी वाढले.

नेमका प्रकार काय?

Advertisement

या बाबत प्राप्त माहिती अशी की,कर्मयोगी नगरमधील हरिकुंज परिसरात कारडा कन्स्ट्रक्शनने रस्ता खोदाई केल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. स्थानिक नागरिक रस्त्यावर आले.कारडा कन्स्ट्र या खोदकामामुळेच विजपुरवठा खंडीत झाल्याचा आरोप करीत स्थानिक नागरिकांनी या खोदकामासाठी महापालिकेची परवानगी नसल्याने हे काम बेकायदेशीर आहे असा दावा केला. संतप्त झालेल्या नागरिकांवर कारडा कॅन्स्ट्रक्शनच्या भाडोत्री सुरक्षा रक्षकांनी दादागिरी करून विरोध मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. या दादागिरीने हे काम बेकायदेशीर असू शकते याचा पहिला दाखला दिला. त्यानंतर नविन नाशिक मधील झाडून सारे पत्रकार घटनास्थळी दाखल झाले. त्यातील एक जागरूक पत्रकार व्हॉइस ऑफ मिडीयचे प्रवक्ता तसेच नविन नाशिक पत्रकार संघांचे अध्यक्ष प्रमोद दंडगव्हाळ यांनी हे संपूर्ण प्रकरण मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.त्यांनीही गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले.त्यावरून हे प्रकरण बेकायदेशीर या शक्यतेला दुजोरा मिळाला. त्यानंतर ही बाब सिडको मनपा विभागीय कार्यालयाचे हेमंत पठ्ठे आणि रत्नपारखी यांना आयुक्तांकडून समजल्यानंतर त्यांच्याच आदेशाने त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. वस्तुस्थिती बाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनीही या प्रकरणाची संपूर्ण माहिती नसल्याचे मान्य करून स्पष्ट बोलण्यास नकार दिला.मनपाची पावती आहे असे समजते हे मोघम उत्तर दिले.

मनपाची परवानगी होती तर संबंधित विभागाकडे त्याची माहिती का नाही? पत्रकारांशी बोलतांना महापालिका आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचा मुद्दा का उपस्थित केला? पैसे भरून परवानगी घेतली होती तर मनपाचा कर भरणाऱ्या स्थानिक नागरिकांची गैरसोय होणार नाही याविषयी खबरदारी का घेतली नाही? काम सुरु काही असे फलक लावून वाहतुकीचा पर्यायी मार्ग का दिला नाही? वाहतूक कोंडी होणार नाही याविषयी काळजी का घेतली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *