असाध्य आजारांचे कारण व अनेक उपचारांती हे आजार बरे का होत नाही ? उडाण हेल्थ आणि डॉ. रत्नाज होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिरात मिळणार उत्तर
असाध्य आजारांचे कारण व अनेक उपचारांती हे आजार बरे का होत नाही ?
उडाण हेल्थ आणि डॉ. रत्नाज होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिरात मिळणार उत्तर
मराठी संस्कृती जतन करा
नाशिक प्रतिनिधी
उडाण हेल्थ आणि डॉ. रत्नाज होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिककरांसाठी इंदिरानगर येथे मोफत आरोग्य तपासणीचे भव्य शिबीर आयोजित करण्यात आले असून अनेक उपचार करूनही आराम पडत नाही व निश्चित निदान निदान होत नाही, अशा सर्व रुग्णांना आजाराविषयी योग्य ते मार्गदर्शन व उपचार या शिबिरात केले जातील.अशी माहिती एम .डी. होमिओपॅथी तज्ञ व मानसिक सल्लागार, डॉ. रत्ना चोपडे यांनी दिली.
“असाध्य आजारांचे कारण व अनेक उपचारांती हे आजार बरे का होत नाही ?”या गंभीर प्रश्नाचे मार्मिक उत्तर देण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध उडान ग्रुप ऑफ होमिओपॅथीचे संचालक होमिओभूषण पुरस्कारित डॉ. मोहनदास गाडबैल M.D. (Homoeo), M.D.H., D.Sc.H. (London), P.G.D.M.D. (Neuro) हे उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार दि. ०३/०१/२०२५ रोजी दुपारी २ वाजता ठिकाण :- २०९२, रूंग्ठा शॉपींग हब, मुंबई आग्रा हायवे, इंदिरानगर, नाशिक येथे प्रश्न तुमचे उत्तर आमचे ! कार्यक्रमात डॉ. मोहनदास गाडबैल (नागपूर),डॉ. शंकर कुराडे (मुंबई),डॉ. सौ. अनुराधा गंभीर (पुणे),डॉ. प्रदीप भंडारी (नाशिक),डॉ. सौ. सुप्रिया जोशी (नाशिक),डॉ. भालचंद्र ठाकरे (नाशिक) M.C.H. माजी अध्यक्ष MUHS सिनेट मेंबर,डॉ. सौ. ज्योती स. पाटील (नाशिक),NDHDA महिला जिल्हाध्यक्ष नाशिक हे होमिओपॅथी तज्ज्ञ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.शिबिरासाठी नाव नोंदणी आवश्यक असल्याने 9370813914 / 9403920250 या क्रमांकावर नोंदणी करण्याचे आवाहन डॉ. चोपडे यांनी केले आहे.
होमिओपॅथीची ट्रीटमेंट का घ्यावी?
पूर्ण उपचार – होमिओपॅथी मध्ये फक्त लक्षणांवर नाही तर शारीरिक मानसिक आणि भावनात्मक स्तरावर जाऊन व्यक्तीवर उपचार केले जातात त्यामुळे आजार पूर्णपणे बरा होण्यास मदत होते.
Advertisementनैसर्गिकरीत्या उपचार – निसर्गातीलच विविध घटकांचा वापर करून होमिओपॅथीची औषधे बनवलेली असतात. त्यामुळे ती अतिशय सौम्य असतात.आणि शरीराला अपाय करणारी नसतात.
व्यक्तिगत ट्रीटमेंट – जशी हाताची बोटे एकसारखी नसतात तसेच प्रत्येक व्यक्ती हा एक सारखा नसतो. म्हणूनच होमिओपॅथी मध्ये प्रत्येक व्यक्तीची पूर्ण विचारपूस करून व संपूर्ण माहिती घेऊनच त्या व्यक्तीला उपचार दिले जातात. म्हणूनच औषध लवकर लागू होते व त्रासातून कायमची मुक्तता होते.
साईड इफेक्ट शिवाय उपचार – होमिओपॅथीची औषधे ही निसर्गातील घटकापासून बनवलेले असल्यामुळे त्याचे आपल्या शरीरावर कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत. व आपली नैसर्गिकरित्या रोगापासून मुक्तता होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते – होमिओपॅथीच्या उपचारांनी आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते व आपल्याला ज्ञात असलेले नसलेले सर्व रोग नाहीसे होतात व आपण सहसा जास्त आजारी पडत नाही, हा होमिओपॅथिक उपचार पद्धती मधील खूप मोठा फायदा आहे.
विविध कारणांसाठी उपचार – होमिओपॅथी उपचार पद्धतीने सर्व प्रकारचे आजार जसे की जुनाट आजार, अचानक उद्भवलेले आजार, मानसिक आजार, भीतीमुळे होणारे आजार, लहान मुलांमधील आजार या सर्वांवर अतिशय प्रभावी औषधे आहेत. होमिओपॅथिक औषधे व्यक्तीला शारीरिक मानसिक आणि भावनात्मक स्तरावर स्टेबल करून जीवनाचे स्वातंत्र्य मिळवून देते.
खर्च कमी – इतर उपचार पद्धतींच्या तुलनेत होमिओपॅथीक उपचार हा कमी खर्चामध्ये होतो. यामध्ये आपल्याला खूप जास्त तपासण्या करण्याची गरज भासत नाही किंवा अनेक वेळा ऑपरेशन करण्याची सुद्धा गरज पडत नाही. म्हणूनच आपला खूप मोठ्या प्रमाणात खर्च वाचतो.
व्यक्तिगत उपचार – प्रत्येक व्यक्तीला उपचारासाठी वैयक्तिक वेळ देऊन त्या व्यक्तीची पूर्ण माहिती विचारून घेतले जाते, व्यक्तीचा आजार, व्यक्तीची शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती, सर्व प्रकारची लक्षणे अशाच अनेक गोष्टी विचारून मग त्यावर उपचार केले जातात. त्यामुळे खात्रीशीरपणे रिझल्ट येतोच.