क्राईमताज्या घडामोडी

वावी पोलीस ठाणे ह‌द्दीत २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 


वावी पोलीस ठाणे ह‌द्दीत २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

सहा संशयित पोलिसांच्या ताब्यात 

 

सिन्नर प्रतिनिधी 

 

वावी पोलीस ठाणे हद्दीत दि. ३१/०३/२०२४ रोजी फिर्यादी मयुरेश निवृत्ती काळे, वय २३ यांचे पाथरे बु॥, ता. सिन्नर, जि. नाशिक येथील राहते घरी दुपारचे सुमारास बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात इसमांनी घरफोडी करून लाखो रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेले प्रकरणी वावी पोलीस ठाणे येथे गुरनं १४२/२०२४ भादवि कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार पोकों विनोद टिळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून केलेल्या तांत्रिक तपासात खालील नमुद आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

सुनिल शंकर म्हस्के, वय ३१, रा. साबरवाडी, ता. येवला, जि. नाशिक,चांगदेव भागीनाथ देवडे, वय ३५, रा. बदापुर, ता. येवला, जि. नाशिक, कैलास शिवाजी मढवई, वय ३४, रा. चिचोंडी, ता. येवला, जि. नाशिक, अकरम कमरूद्दीन शेख, वय ३१, रा. विंचुर रोड, येवला, ता. येवला, जि. नाशिक,जीवन वाल्मीक कोल्हे, वय २६, रा. हडप सावरगाव, ता. येवला, जि. नाशिकअलका दिपक जेजुरकर, वय ४८, रा. येवला, ता. येवला, जि. नाशिक या आरोपींकडून गुन्हयात चोरून नेलेले रोख रक्कमेतील १४ लाख ७ हजार रूपये,गुन्हयात चोरीस गेलेले सर्व दागिने व चोरीचे पैशातुन खरेदी केलेला ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल फोन तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मारूती इटिंगा कार क. एव.एच.०४.ई.टी. ७८९५ व इटींगा कार क. एम. एच.१४.क्यु.एक्स.४३९९ अशा दोन चारचाकी असा एकुण २५ लाख रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

Advertisement

यातील आरोपीतांकडे गुन्हयाचे तपासात चौकशी केली असता, यातील फिर्यादी व आरोपी क्र. ६ हे एकमेकांना ओळखत असुन फिर्यादीचे घरी वरील नमुद रक्कम व दागिने असलेबाबत आरोपी क्र.६ हिस माहित होते. घटनेच्या दिवशी यातील आरोपी क्र. १ व ६ यांनी फिर्यादीस शिर्डी येथे खरेदीसाठी सोबत नेल्यानंतर आरोपी क्र.२ ते ५ यांनी फिर्यादीचे राहते घराची टेहाळणी करून दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून, घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली रोख रक्कम व देवीच्या अंगावरील दागिने असा लाखोंचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासकामी वावी पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि नाना शिरोळे, पोलीस अंमलदार नवनाथ सानप, विश्वनाथ काकड, विनोद टिळे, मेघराज जाधव, उदय पाठक, संदिप नागपुरे, हेमंत गरूड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, गिरीष बागुल, चालक विकी म्हसदे, महिला पोलीस अंमलदार योगिता काकड, छाया गायकवाड, अस्मिता मढवई यांचे पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *