क्राईम

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ मनोहर जोशी यांचे निधन; दुपारी दोन नंतर दादर स्मशान भूमीत देणार अखेरचा निरोप


 

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ मनोहर जोशी यांचे निधन;

दुपारी दोन नंतर दादर स्मशान भूमीत देणार अखेरचा निरोप

 

मुंबई प्रतिनिधी

शिवसेनेचे जेष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्राचे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे आज (दिनांक 23 फेब्रुवारी 2024 )रोजी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.

Advertisement

 

दिनांक 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.

माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्यावर दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार होतील.

मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *