ताज्या घडामोडी

स्वराज्यने फुंकले सिन्नर विधानसभा मतदार संघात परिवर्तनाचे रणशिंग; सिन्नरच्या कानाकोपऱ्यात मेळावे,शाखा शुभारंभाचा झपाटा 


स्वराज्यने फुंकले सिन्नर विधानसभा मतदार संघात परिवर्तनाचे रणशिंग;

सिन्नरच्या कानाकोपऱ्यात मेळावे,शाखा शुभारंभाचा झपाटा 

 

 

सिन्नर प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर येथे तालुकाप्रमुख शरद तुकाराम शिंदे पाटील यांच्या पुढाकाराने संपर्कप्रमुख केशव गोसावी, जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे,प्रदेश सदस्य ज्ञानेश्वर थोरात यांच्या हस्ते शाखेचे नारळ फोडून उदघाटन करण्यात आले.यावेळी महिला व पुरुष कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्सफुर्त पाठिंबा दिला.

यावेळी कार्यकर्ते उतस्फुर्तपणे छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी राजे की जय….डॉ. बाबासाहेब की जय,…..महात्मा फुलेंकी जय.।।।।,अण्णाभाऊ साठे की जय,.।।।

 

 

जय भवानी जय शिवाजी..

स्वराज्य पक्षाचा विजय असो….

छत्रपती संभाजीराजे भोसले आगे बढो अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

यानंतर स्वराज्य पक्ष कार्यालयाचे प्रमुख पाहुणे केशव गोसावी, जिल्हा अध्यक्ष डॉ. रुपेश नाठे,प्र.सदस्य ज्ञानेश्वर थोरात, उमेश शिंदे यांच्या हस्ते फित कापत उदघाटन करण्यात आले.

जनतेचे प्रशन सोडवण्यासाठी संपर्क कार्यालय तालुकाप्रमुख शरद शिंदे पाटील यांनी उघडल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांनी स्वागत केले.यानंतर मेळावा घेण्यात आला.यावेळी संपर्कप्रमुख केशव गोसावी यांनी पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे भोसले व स्वराज्य पक्षाची भुमिका विशद केली.छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला बरोबर घेत स्वराज्य निर्माण केले. तोच विचार घेऊन छत्रपतींचे वशंज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केली केली असून या पक्षाची सर्वदूर घोडदौड सुरु आहे.

जिल्हाध्यक्ष डॉ. रुपेश नाठे यांनी सिन्नर विधानसभा स्वराज्य पक्ष लढवणार अशी घोषणाही यावेळी केली. शरद शिंदेंना जर एवढया संख्येने महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे, पुरुषांचा पाठिंबा आहे,बहिणींचा आशिर्वाद आहे.तर सिन्नर विधानसभा स्वराज्य पक्ष लढवणारच असा निर्धार व्यक्त केला. तुम्हाला सिन्नर तालुक्यात राजकीय परिवर्तन करावयाचे आहे तर स्वराज्य पक्ष लढणार व पुर्ण साथ देणार,असेही त्यांनी शरद शिंदे यांना सांगितले.छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे नासिक जिल्ह्यातवर जास्त प्रेम आहे.लवकरच पक्षप्रमुख छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या उपस्थितीत सिन्नर येथे सभा घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

Advertisement

यावेळी शरद शिंदे पाटील,यांनी सिन्नर तालुक्यातील प्रश्न मांडले.सिन्नर तालुक्यातील शेतीला दारणा म्हाळुंगीचे पाणी आणून दुष्काळी शेतकऱ्यांना बागायतदार करावयाचे आहे.

तसेच युवकांचा बेरोजगारी प्रश्न सोडवायचा आहे. यासाठी सिन्नर तालुक्यातील वाजे कोकाटे यांची पिढयांपिढयांची सत्ता हटवुन परिवर्तन करावयाचे आहेत. एक चार वेळा आमदार, तर दुसऱ्या घरात पिढयांपिढया आमदार खासदार. परंतु सिन्नर तालुक्यातील दुष्काळ हटला नाही. तरूणांना एमआयडीसीत नोकऱ्या मिळत नाहीत.यासाठी वाजे,कोकाटे हटवुन नवीन आमदार करायचा आहे.. यासाठी स्वराज्य पक्षाने साथ दयावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

शरद शिंदे पाटील यांच्या या विचाराला संपर्क प्रमुख गोसावी व जिल्हा प्रमुख डॉ रुपेश नाठे यांनी स्वराज्य पक्ष सिन्नर विधानसभा लढणार. शरदभाऊ शिंदे यांच्या या विचारास स्वराज्य पक्ष ताकदीने साथ देणार असे सांगत सिन्नर विधानसभाचे रणशिंग फुंकले.

यापूर्वी शरद शिंदे पाटील यांनी सव्वा दोन वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देत,शिंदे गट शिवसेना वाढवली.

परंतु माजी खासदार हेमंत गोडसे व जिल्हा नेते यांच्या गटबाजीला कंटाळून मुख्यमंत्री शिंदे गटाचे, तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांनी पक्ष पद सोडत स्वराज्य पक्षाचे तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारली.आणि २४/८/२०२४ शनिवार रोजी दणक्यात स्वराज्य पक्षाची सिन्नर तालुक्यात सुरुवात केली.शाखा उदघाटन, संपर्क कार्यालय उदघाटन व मेळा कार्यक्रम घेत इरादा ल.ताकद स्पष्ट केली.

यावेळी विजय चुंबळे,रेखा जाधव, शिवाजी गुंजाळ, जयश्री गायकवाड महिला तालुका अध्यक्ष,नितीन दातीर,सुरेश सानप,मंगला मोरे, निशा वराडे,प्रमिला लोंढे, रामबाबा शिंदे, योगिता पाटील, चिंधुभाऊ गुंजाळ,स्मिता लोणारे,सुरेखा वडस्कर,,रूषीकेश कटारे,राजेश घोडे, भुषण रुपवते,पिनु शिंदे, कैलास हिरे,क्रुष्णा पटेल, नंदु साळवे,अलका वाकचौरे, माया जाधव,काशाबाई शिंदे, लिलाबाई तुपे,माया सुकेणकर,सुरेखा शिंदे, पुनम दळवी. वैष्णवी बर्डे

मणिकर्णिका गायकवाड,ज्योती सुर्यवंशी,रतन जाधव,हिरामण जाधव,तानाजी शिंदे सह महिला पुरुष सहभागी होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *