सिन्नर विधानसभेसाठी प्रहार जनशक्तीच्या तीन महिलांची दावेदारी
सिन्नर विधानसभेसाठी प्रहार जनशक्तीच्या तीन महिलांची दावेदारी
सिन्नर प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्षाच्या तीन महिलांनी सिन्नर विधानसभेची उमेदवारी मागितली असून नामदार बच्चु कडू, संपर्कप्रमुख दत्तू बोडके,जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे, सिन्नर तालुका अध्यक्ष कैलास दातीर,दिव्यांग जिल्हाध्यक्ष अरुण पाचोरे, या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीची मागणी करणारे पत्र सुपूर्द केले आहे. जिल्हा संघटक वैशालीताई अनवट यांनी उमेदवारीचा दावा करताना उच्चशिक्षित आहेत,प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्ष म्हणून प्रभावशाली काम केले. महिला संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे.सध्या आता जिल्हा संघटक म्हणूनही चांगले काम करीत असून त्या तालुक्यातील भोकनी या गावच्या रहिवासी आहेत. महिला कार्याध्यक्ष आशाताई गोसावी यांनीही उमेदवारी मागितली असुन अनेक वर्षापासून समाजकारणामध्ये गोरगरिबाला मदत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. काही काळ शिवसेनेच्या तालुकाध्यक्ष, मनसेच्या तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. दोन वेळा त्या जिल्हा परिषद निवडणूक लढल्या आहेत. त्यांचा थोड्या मताने पराभव झाला आहे.तालुक्यातील डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.त्या पण प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी मागत आहेत. सिन्नरच्या महिला तालुकाध्यक्ष पुष्पा भोसले यांना भोसले घराण्याचा वारसा आहे. सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून छोटे-मोठे महिलांचे काम असो बँकेचे काम, बचत गटाचे काम करण्यामध्ये त्यांचा नावलौकिक आहे. त्याही विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. एकूणच प्रहार जनशक्ती तर्फे तीन महिलांनी उमेदवारी मागितल्याने या पक्षाची लोकप्रियता वाढत असल्याची चर्चा आहे. या महिलांना जनशक्ती दिव्यांग बांधव शेतकरी कामगार यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.