महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचे षडयंत्र, लकी जाधव यांचा आरोप.. धनगर आदिवासी समाजात संघर्ष पेटवण्याचा डाव: मिंधे सरकारच्या खासदार आमदारांना गाव बंदी; कार्यालय, रेल्वे मार्ग उखडणार, नाशिक जिल्ह्यातून जाणारे पाणी रोखणार
महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचे षडयंत्र, लकी जाधव यांचा आरोप..
धनगर आदिवासी समाजात संघर्ष पेटवण्याचा डाव:
मिंधे सरकारच्या खासदार आमदारांना गाव बंदी;
कार्यालय, रेल्वे मार्ग उखडणार, नाशिक जिल्ह्यातून जाणारे पाणी रोखणार
मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना, ओबीसी मराठा संघर्ष शिगेला पोहचला असताना धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी समाज आक्रमक होतोय. आदिवासीच्या हक्काच्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करू नये अशी भूमिका आदिवासी समाजाने घेतली आहे. या संदर्भात नाशिक येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केलेत..
दरम्यान शासनाच्या खरगे समिती विरुद्ध उद्या गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी आदिवासी समाज निवेदनांचा पाऊस पाडणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आदिवासी समाजासोबत समाजाचे खासदार आमदारही या आंदोलनात सहभागी असून सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी नाशिकहून मराठवाडा विदर्भाला जाणारे पाणी रोखण्याचा, महाराष्ट्रातून जाणारे रेल्वे मार्ग उखाडण्याचा गंभीर इशारा तसेच धनगर आदिवासी समाजात भांडण लावून महाराष्ट्राचे मणिपूर करण्याचे सरकारचे षडयंत्र असल्याचा जाधव यांचा आरोप गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात सामाजिक यादवी निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी राजकीय नेत्यांवर असेल.
ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक