ताज्या घडामोडी

शहर तालुक्यातील अनाधिकृत मोबाईल टाँवरवर कारवाई न केल्यास आंदोलन -फड टाँवरचे स्टक्चरल आँडीट करून विनापरवाना टाँवर सिल करा 


शहर तालुक्यातील अनाधिकृत मोबाईल टाँवरवर कारवाई न केल्यास आंदोलन -फड

टाँवरचे स्टक्चरल आँडीट करून विनापरवाना टाँवर सिल करा 

संगमनेर –

संगमनेर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत विनापरवाना थकबाकीदार विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर असून वर्षानुवर्ष शासनाचा महसूल बुडवत आहे. अशा अनाधिकृत टाँवरवर नगर पालिका व ग्रामपंचायतींनी कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख संजय फड यांनी दिला आहे.

 

शहरात उपनगरात इमारतीवर मोठ्या प्रमाणावर मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे. अनेक कंपन्यांनी नगर पालिकेची कुठलीही परवानगी न घेता मोबाईल टॉवर हे विनापरवाना उभारले आले आहे. यामुळे वर्षनुवर्षे शासनाचा महसूल बुडत आहे. तर काही टाँवर कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून त्यांना पालिका पाठीशी घालत आहे. या मोबाईल टॉवरमुळे परिसरातील नागरिकांना पक्षांना याचा त्रास होत असून पावसाळयाचे दिवसात या मोबाईल टॉवरमुळे दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रार व सुचना करूनही नगर पालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. या संदर्भात शिवसेनेकडे तक्रारी आल्या असून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अनेक मोठ्या इमारतीवर एकापेक्षा अधिक मोबाईल टॉवर उभारले असून त्याचे कुठलेही स्टक्चरल आँडीट पालिकेने केले नाही. पावसाळ्यापूर्वी सर्व विनापरवाना मोबाईल टाँवर काढुन घ्यावे व थकबाकीदार मोबाईल टाँवर सिल करून कारवाई करावी अन्यथा पालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल.

Advertisement

तालुक्यातही ग्रामपंचायत हद्दीत अशाच प्रकारे मोबाईल टॉवर उभारण्यात आले असून तेही विनापरवाना थकबाकीदार मोबाईल टॉवर आहे. ग्रामपंचायतींनी अशा मोबाईल टॉवरवर कारवाई करावी,ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत होर्डिंग्ज असून या त्याचेवरही कारवाई करणे आवश्यक आहे. नुसतीच शहरातील होर्डिंग्ज वर पालिका कारवाई करत असून मोबाईल टॉवरला मात्र संरक्षण देत आहे, आता ग्रामपंचयतीनी देखील कठोर कारवाई न केल्यास अशा ग्रामपंचायती़समोर मोबाईल टॉवर विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा संजय फड यांनी दिली आहे.

 

  चौकट- होर्डिंग्ज वर कारवाई टाँवरला संरक्षण

नगर पालिका ग्रामपंचायत फ्लेक्स वर कारवाई करून दंड वसूल करत आहे. मात्र इमारतीवर मोठमोठे अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे. विनापरवाना तर थकबाकी टाँवरची संख्या मोठी आहे याकडे पालिका ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. यात अधिकारी कर्मचारी सहभागी आहे. या मोबाईल टॉवरचे स्टक्चरल आँडीट करून थकबाकी वसुल करावी. संजय फड- शिवसेना (उबाठा) संगमनेर तालुका प्रमुख


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *