व्हॉईस ऑफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र अधिवेशनात सिन्नर येथील”ज्येष्ठ पत्रकार अरविंद गुजराती यांचा सन्मान”
व्हॉईस ऑफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र अधिवेशनात सिन्नर येथील”ज्येष्ठ पत्रकार अरविंद गुजराती यांचा सन्मान”
नाशिक नगरीत भव्य दिव्य अधिवेशनात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांची उपस्थिती
सिन्नर
महाराष्ट्र शासनाने सन 2019 मध्ये ज्येष्ठ पत्रकारांना समाजामध्ये सन्मानाने जीवन जगता यावे, कोणापुढे हात पसरावे लागणार नाही यासाठी स्व. बाळशास्त्री जांभेकर सन्मान पेन्शन योजना लागू केलेली आहे. नियमाप्रमाणे सर्व कागदपत्रांची वेळोवेळी पूर्तता करूनही अनेक ज्येष्ठ पत्रकारांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबांची आर्थिक कुचंबना होत आहे या गंभीर प्रश्नाकडे 41 देशात कार्यरत असलेल्या व देशात सर्वाधिक 37 हजार पत्रकार पदाधिकारी सदस्य असलेल्या व पत्रकारांची क्रमांक एक ची संघटना असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या संघटनेने कार्य करावे अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार अरविंद गुजराती यांनी शनिवारी दिनांक 25/ 5 /2024 रोजी वोईस ऑफ मीडिया उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन आयोजित नाशिक यांनी आयोजित केलेल्या श्रीफळ, शाल व भेटवस्तू देऊन सत्कार व सन्मान केला. त्या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना श्री अरविंद गुजराती यांनी आपले मनोगत व्यक्त केले .अध्यक्षस्थानी वाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री संदीप काळे साहेब हे होते
ज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी करण्यात आली.