सिन्नरला समता परिषदेच्या वतीने मनुस्मृतीचे दहन
सिन्नरला समता परिषदेच्या वतीने मनुस्मृतीचे दहन
*अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन*
सिन्नर
मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय शिक्षणात समावेश करण्याबाबत शिक्षण विभागाने तयार केलेल्या आराखड्याला विरोध करण्यासाठी आज शनिवारी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सिन्नर शाखेच्यावतीने तीव्र निषेध नोंदवत मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. सिन्नर शहरातील शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन केले. समता परिषदेचे समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगझाप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात समता परिषदेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी घोषणाबाजी करत शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. यावेळी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगझाप,महामित्र दत्ता वायचळे, हरिभाऊ तांबे, राजेंद्र भगत,समता परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप भालेराव, शहराध्यक्ष विशाल चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे किरण कोथमिरे, बलराम भंडारी, संतोष पवार,संजय लोखंडे, महिला आघाडीच्या मेघा दराडे, जयश्री पवार, मोनाली जाधव, रुबीना सय्यद,संगीता आव्हाड, कल्पना काळे,अंजली वायचळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.