भारताला विश्वगुरु बनवायचे तर तरुण पिढीशिवाय ते शक्य नाही- ले.कर्नल कुलगुरू डॉ माधुरी कानिटकर
भारताला विश्वगुरु बनवायचे तर तरुण पिढीशिवाय ते शक्य नाही- ले.कर्नल कुलगुरू डॉ माधुरी कानिटकर
नाशिक -प्रतिनिधी
देशाची तरुण पिढी आपला देश पुढे घेऊन जात आहे. भारताला विश्वगुरु बनवायचे तर तरुण पिढीशिवाय ते शक्य नाही. अडचणी आहेत , मात्र आपल्या देशाची तरुण पिढी काबिल असल्याने
ते बदल घडून आणू शकतील , असा विश्वास महाराष्ट्र् आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू ले . कर्नल डॉ माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केला. नाशिक उद्योजक मंचतर्फे एनईएफ 24 व्हिजन एक्स ‘आज से भविष्य तक’ या कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करताना त्या बोलता होत्या . यावेळी विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम , मिसेस वर्ल्ड डॉ आदिती गोवित्रीकर , संजय लोढा , संगीत लोढा व अजय बोहरा हे उपस्थित होते.
नाशिकला सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण उद्योगांचे केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने संजय लोढा व अजय बोहरा हे गत बारा वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. पुढे बोलताना डॉ कानिटकर म्हणाल्या की , जीवनात समस्या वैगरे असे काही नसते असते ते सोल्युशन .समस्यांचा अभ्यास करा , संशोधन करा त्यावर सोल्युशन नक्की मिळणारच. त्यासाठी शरीर आणि मन दोन्ही निरोगी असायला हवीत . जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर दूरदृष्टी सोबत टिमसोबतची वचनबद्धता ,, इनोव्हेशन्स , उत्तम आर्थिक पाठबळ आणि संसाधनांची उपलब्धता यांचे नियोजन , मालकी , आणि प्रचंड कष्ट घेण्याची क्षमता असली तर यश मिळतेच मिळते. यावेळी डॉ प्रवीण गेडाम आणि आदिती गोवित्रीकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले . डॉ गेडाम म्हणाले की, भारताची आज जी प्रगती होत आहे त्यामध्ये उद्योजकांचे मोठे योगदान आहे. देशात उदयोजक मोठे बदल घडून आणू शकतात , असा विश्वास डॉ गेडाम यांनी व्यक्त केला . यामध्ये स्थानिक उद्योजकांचा सुद्धा मोठा वाटा असून, नाशिकच्या दादासाहेब फाळके यांनी देशाला सर्वात मोठी इंडस्ट्री दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात राजेश गोपीनाथन (माजी सीईओ आणि एमडी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे प्राध्यापक, आयआयटी),अशोका बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख,दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स च्या संचालिका देवश्री चंदे, दीपक चंदे, डॉ राज नगरकर, एम बी शुगरचे संस्थापक विजय लोढा , सह्याद्री चे विलास शिंदे , संभय जैन, संजय अरोरा , उमेश दाशरथी, डॉ. जगत शाह,धीरज कुमार, कुशल लोढा,यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमास दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, एचसीजी मानवता, केआयएमएस हॉस्पिटल, नाहर डेव्हलपर, झेन फिजिओ, एमबी शुगर, एक्सप्रेस इन, निवेदिता मॅटर्निटी होम, कैझेन पायलेट्स, टिमस लगेज, मोरेस क्रिएटिव्ह, एमवाय एफएम, रिदम इव्हेंट्स यांचे सहकार्य लाभले. आभार अजय बोहरा यांनी मानले.