*संगमनेरमध्ये गोवंश कत्तलीविरोधात धडाकेबाज कारवाई;* *४ हजार किलो गोमांस जप्त, १६ गोवंश जनावरांची सुटका;* *१५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत*
*संगमनेरमध्ये गोवंश कत्तलीविरोधात धडाकेबाज कारवाई;*
*४ हजार किलो गोमांस जप्त, १६ गोवंश जनावरांची सुटका;*
*१५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत*
संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने गोवंश कत्तलीविरोधात सलग दोन मोठ्या कारवाया करत एकूण ४ हजार किलो गोमांस जप्त केले असून, कत्तलीसाठी ठेवलेल्या १६ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे. या दोन्ही कारवायांत मिळून १५ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणांमुळे संगमनेर शहरात बेकायदेशीर गोवंश कत्तलीचे जाळे उघडकीस आले आहे.
*पहिली कारवाई : १ हजार किलो गोमांस जप्त*
दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ८.३० वाजता संगमनेर शहरातील जमजम कॉलनी, गल्ली क्रमांक ७ येथील पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळाली. माहितीच्या आधारे दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला.
या छाप्यात समद जावेद कुरेशी व नवाज जावेद कुरेशी (रा. जमजम कॉलनी, संगमनेर)
यांच्या ताब्यातून १,००० किलो गोमांस जप्त करण्यात आले. या गोमांसाची बाजार किंमत प्रति किलो ३०० रुपये प्रमाणे सुमारे ३ लाख रुपये इतकी आहे.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ८४/२०२६ अन्वये
भारतीय न्याय संहिता कलम २७१, ३२५, ३(५) तसेच
महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) चे कलम ५(क), ९(अ)
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*दुसरी कारवाई : ३ हजार किलो गोमांस व ६ जिवंत गोवंश जप्त*
Advertisement
दरम्यान, २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहरातील मदिना नगर, गल्ली नं. २ येथील पत्र्याच्या वाड्यात गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना मिळाली. त्यानंतर तात्काळ छापा टाकण्यात आला.
या कारवाईत
सलमान हारून मणियार (वय ३५, रा. मोमिनपुरा, संगमनेर)
हा आरोपी ताब्यात घेण्यात आला.
छाप्यात पोलिसांनी
३ हजार किलो गोमांस (अंदाजे किंमत ₹९,००,०००),
३ मोठे गोवंश व ३ वासरे (किंमत ₹१,५०,०००),
दोन कुऱ्हाडी,
एक लोखंडी वजनकाटा,एक चाकू असा एकूण ₹१०,५७,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नं. ९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१० गोवंश जनावरांची सुटका
याच कालावधीत कोल्हेवाडी रोड, जमजम कॉलनी परिसरात कत्तलीच्या उद्देशाने आणलेली १० गोवंश जनावरे चारा-पाण्याविना निर्दयतेने बांधून ठेवलेली आढळून आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ही जनावरे मुक्त केली असून त्यांना जिवदया गोशाळा, सायखिंडी (ता. संगमनेर) येथे सुरक्षित संगोपनासाठी सुपूर्द करण्यात आले आहे. या जनावरांची अंदाजे किंमत २ लाख रुपये आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन, पुढील तपास सुरू
ही संपूर्ण कारवाई
पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ घार्गे,
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ बाघचौरे
यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत
पोलीस निरीक्षक समीर बारवकर,
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, रावसाहेब लोखंडे,
तसेच संगमनेर शहर पोलीस स्टेशन व उपविभागीय कार्यालयातील अधिकारी व अंमलदार सहभागी होते.
या प्रकरणांचा पुढील तपास
पोहेकॉ महेंद्र सहाणे व मपोना सुजाता थोरात करीत आहेत.
……..




