ताज्या घडामोडी

*सिन्नर येथे महामित्र परिवारातर्फे हुतात्मा दिन साजरा*


*सिन्नर येथे महामित्र परिवारातर्फे हुतात्मा दिन साजरा*

सिन्नर प्रतिनिधी

*३० जानेवारी २०२६ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७८ व्या हुतात्म दिनानिमित्त महामित्र परिवार यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले*

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली

Advertisement

*या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की* राष्ट्रपिता महात्मा गांधी हे बॅरिस्टर झाल्यानंतर वकिली करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले. तिथे त्यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला. प्रवासादरम्यान त्यांना प्रथम वर्गातून खाली ढकलण्यात आले कारण ते काळ्या वर्णाचे होते. या घटनेने त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी सत्याग्रह सुरू केला. सत्याग्रह म्हणजे सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने केलेला निषेध होय. गांधीजींनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आणि तिथल्या भारतीयांच्या हक्कांसाठी लढा दिला.दक्षिण आफ्रिकेहून परतल्यानंतर गांधीजी भारतात स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. त्यांनी देशभरात फिरून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. अहिंसक मार्गाने ते ब्रिटिशांच्या विरोधात उभे राहिले.ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी महात्मा गांधींनी अहिंसक आंदोलनाचा वापर केलाइंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या कारणांसाठी त्यांना भारतात अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला.गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला. स्वतःदेखील याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले अशा महान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वि‌‌नम्र अभिवादन

*या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश माळी यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार राजेंद्र सातपुते यांनी मानले*

याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे प्रकाश माळी मनोज माळी राजेंद्र सातपुते गणपत काळे संजय पोटे सुभाष परदेशी धनंजय परदेशी अशोक भागवत सोमनाथ लोहारकर गोपीनाथ वाजे नामदेव कुटे नितीन शिरसाठ आदी उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *