प्रशासकीय भावनातील लिफ्ट सुरू न केल्यास ठिय्या आंदोलन – फड संगमनेर प्रशासकीय भावनात लिफ्ट प्रभावी महीला, जेष्ठ नागरिकांचे हाल
प्रशासकीय भावनातील लिफ्ट सुरू न केल्यास ठिय्या आंदोलन – फड
संगमनेर प्रशासकीय भावनात लिफ्ट प्रभावी महीला, जेष्ठ नागरिकांचे हाल
संगमनेर –
शहरातील नवीन नगर रोड येथे असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भावनात विविध शासकीय कार्यालये आहेत. या ठिकाणी रोज हजारो नागरिकांची येजा सुरू असून या ठिकाणची लिफ्ट बंद असल्याने याचा नागरिकांना मोठा त्रास होतो. आठ दिवसात ही लिफ्ट सुरू न झाल्यास प्रांताधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख संजय फड यांनी दिला.
यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात पोस्ट ऑफिस, सह दुय्यम निबंधक कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, कृषी कार्यालय, उपनिबंधक कार्यालय , पोलीस उपाधीक्षक कार्यालय, मीटिंग हॉल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असे विविध कार्यालय आहेत. यामुळे शासकीय कामासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातून हजारो नागरिक या ठिकाणी येत असतात. पहिल्या , दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर जाण्या येण्यासाठी जिन्याचा वापर करावा लागतो. याचा त्रास महिला, जेष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच आजारी व्यक्तींना होतो. अनेकदा हे जिने चढताना दम लागून श्वास घेताना त्रास होतो. याबाबतच्या अनेक तक्रारी नागरिकांनी शिवसेनेकडे यापूर्वीही केल्या आहेत. हे प्रशासकीय भवन सुरू झाल्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लिफ्ट बंद आहे. नागरिकांना जिने चढताना त्रास होत असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी असलेली लिफ्ट आठ दिवसात सुरू करावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने प्रांताधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची असेल असे संजय फड यांनी निवेदनात म्हटले आहे.
कोट- प्रशासकीय भवन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने कामाची गुणवत्ता राखली नसल्याने ठिकठिकाणी तडे गेले असून अनेक ठिकाणच्या फरच्या वर आल्या आहे. तसेच स्वच्छतागृहांची दूर अवस्था असून दुर्गंधीमुळे त्रास होतो. याबाबतही उपाययोजना करून इमारतीच्या सुविधेकडे लक्ष द्यावे.
संजय फड – शिवसेना तालुकाप्रमुख.