निर्धार पक्का; महंतांचा सोशल मीडियावर डंका
निर्धार पक्का; महंतांचा सोशल मीडियावर डंका
त्र्यंबकेश्वरच्या साधुंनी फुंकले लोकसभेसाठी रणशिंग, सिद्धेश्वरानंद महाराजांचे आव्हान कायम
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी
नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवारीचा पेच सोडविण्यास भल्या भल्या राजकीय पक्षांची भंबेरी उडत असतांना इकडे साधू संत महंतांनी मात्र आपली उमेदवारी जाहीर करून प्रचारही सुरु केला आहे. यंदा अध्यात्मिक क्षेत्रात आपले वैशिष्ट्य पुर्ण स्थान निर्माण केलेल्या काही चर्चित चेहऱ्यांनी धर्म सत्तेवरील आपला अधिकार कायम ठेवून राजसत्तेला गवसनी घालण्याचा निर्धार व्यक्त केल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहेत. त्या बातम्या आता चर्चेवर न थांबता प्रत्यक्षात येऊ पहात असून साधू महंतांच्या लोकसभा निवडणुकीतील सहभागामुळे नाशिकमध्ये गोरखपूर उत्तरप्रदेशचा योगी पॅटर्न अजमावला जाण्याचे संकेत आहेत.
नुकतीच त्र्यंबकेश्वर येथील साधूंनी बैठक घेऊन नाशिक लोकसभा मतदार संघासाठी
त्रंबकेश्वरचे महंत सिद्धेश्वरांनंद महाराज हे उमेदवारी करणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला होता. पंचायती निरंजनी आखाड्यात झालेल्या साधू महंताच्या बैठकीत येथील विविध आखाड्यांचे आश्रमाचे कुटियाचे दीडशे साधू महंत संत याबैठकीला उपस्थित होते.
त्रंबकेश्वर नजीक बेझे येथे प्रसिद्ध श्रीराम शक्ती पिठाचे प्रमुख महामंडलेश्वर सोमेश्वरांनंद सरस्वती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीतील निर्धार आता वेगवेगळ्या स्वरूपात समाज माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवीला जाऊ लागल्याने राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या उरात धडकी भरू लागली आहे.
महामंडलेश्वर सोमेश्वरानंद महाराज म्हणाले की अनेक वेळा शुभकार्यासाठी साधू महंत यांना बोलावले जाते. आता सिंहस्थ कुंभमेळा देखील जवळ आला आहे.आणि आता साधुनीच पुढे येणे गरजेचे आहे. लोकशाही तंत्रात संसदेत एका साधू महात्माला निवडून देणे हे सर्वांचे जबाबदारी असल्याचे आवाहन महामंडलेश्वर सोमेश्वरानंद महाराज यांनी केले आहे.साधू ज्या मतदार संघाचा प्रतिनिधी आहे, त्या भागाचा, त्या राज्याचा विकासही झाला तसा विकास करण्यासाठी साधूंची उमेदवारी काळाची गरज आहे.असे त्रंबकेश्वरचे आखाडा परिषदेचे महंत स्वामी शंकरांनंद सरस्वती महाराज म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगींना संधी दिल्याचे ते म्हणाले.प्रसंगी अपक्ष का होईना लढा उमेदवारी करा असा सल्ला इशारा देखील साधूंनी यावेळी दिला.
महंत गिरिजानंद सरस्वती,
ब्रह्मदर्शआश्रमाचे श्रीमंहंत रामानंद सरस्वती, पंचायती निरंजन आखाड्याचे धनंजय गिरी महाराज, अन्नपूर्णा आश्रमाचे महंत दिव्यानंद महाराज महंतश्रीनाथानंद,
महंत सुदर्शनानंद , महंत ब्रहस्पतिगिरी, दिपेंद्र गिरी नारायणदास ,जयदेवगिरी, रतन महाराज, अजय पुरी, योगी विवेक नाथ, आदिनाथ आखाडा महंत,
महंत रामानंद , महंत महंत श्रवणदास, महंत सितारामबाबा हे आदी साधू महंतांचा स्वामी सिद्धेश्वरानंद महाराजांना पाठिंबा आहे.