नाशिक गुन्हे शाखा युनिट-१ ची दमदार कामगिरी
शहर एम डी मुक्त करण्याचा निर्धार :-
अंमली पदार्थ विक्री व सेवन करणा-या दोन इसमांना केले जेरबंद
गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी
नाशिक प्रतिनिधी
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात अमली पदार्थ विक्री तसेच सेवन करणाऱ्या प्रवृत्तीच्या मुसक्या आवळण्याचा चंग बांधला असून त्याचाच एक भाग म्हणून शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोन संशयितांच्या मुसक्या बांधल्या आहेत
या संदर्भात प्राप्त माहिती अशी की,गुन्हेशाखा युनिट क १ चे व पोलीस अधिकारी व अंमलदार अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढत असतांना गुन्हेशाखेचे पोअं राजेश राठोड यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की,” दोन इसम नामे फारूख शेख व महेश शिरोळे या इसमांकडे एम.डी हा अंमली पदार्थ असुन ते चारचाकी पांढ-या रंगाच्या वाहनातून म्हसोबावाडी समोरील, मनपा गार्डन, पंचशिल नगर, गंजमाळ नाशिक या ठिकाणी एम.डी. (मॅफेड्रॉन) पावडर या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता येणार आहे.” अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि/चेतन श्रीवंत, पोहवा/स्मेश कोळी, पोहवा देविदास ठाकरे, पोअं/विलास चारोस्कर, नितीन जगताप, मुक्तार शेख, राजेश राठोड, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, मपोअं/अनुजा येलवे, चापोअं समाधान पवार यांच्या पथकाने पथक तयार करून सदर ठिकाणी जावुन सापळा लावला.आणि एम.डी विक्री करणारे फारूख सलीम शेख, वय ३३वर्षे, रा-श्रमिकनगर गंजमाळ भद्रकाली नाशिक, व महेश उर्फ जाना दत्तात्रय शिरोळे, वय-४८वर्षे, रा-हनुमान मंदिराजवळ, शिवाजीनगर, इगतपुरी जि. नाशिक यांना ताब्यात घेतले. फारूख शेख यांच्या अंगझडतीत १५,०००/-रूपये किंमतीची ३ ग्रॅम एम.सी. (मॅफेड्रॉन) तसेच मोबाईल व महेश दत्तात्रय शिरोळे यांच्या अंगझडतीत ७५,०००/-रूपये किंमतीची १५ ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) तसेच मोबाईल व गुन्हयात वापलेली चारचाकी वाहन असा दोघांच्या ताब्यातुन एकुण २,१०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर आरोपीताविरूध्द भद्रकाली पोलीस ठाणे येथे एन.डी.पी. एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २२ (५), २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नाशिक पोलीसांमार्फत नाशिक शहर हे एम. डी मुक्त करण्याबाबतचे धोरण अवलंबिले असुन कोणीही अंमली पदार्थ विकी व सेवन करू नये याबाबत सक्त आदेश दिले आहेत.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा.डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड, सपोनि/हेमंत तोडकर, पोउनि/चेतन श्रीवंत, सपोनि/सुरेश माळोदे, पोहवा रमेश कोळी, शरद सोनवणे, देविदास ठाकरे, प्रदिप म्हसदे, पोअं/राजेश राठोड, विलास चारोस्कर, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, राजेश राठोड, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, रामा बर्डे, मपोअं/अनुजा येलवे, चापोअं समाधान पवार, यांच्या पथकाने केली आहे.