विशाळगडावरील अतिक्रमणे काढून संभाजी राजेंवरील कारवाई थांबवा ; अठरापगड मराठा समाजासह सिन्नर शिवसेनेचे तहसीलदारांतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन
विशाळगडावरील अतिक्रमणे काढून संभाजी राजेंवरील कारवाई थांबवा ;
अठरापगड मराठा समाजासह सिन्नर शिवसेनेचे तहसीलदारांतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन
सिन्नर प्रतिनिधी
विशाळगडावरील मस्जिदसह सर्व अतिक्रमणे काढावे व छत्रपती संभाजी राजे यांच्यावरील कारवाई थांबवावी यासाठी सिन्नर मराठा अठरापगड समाज व स्वराज्य पक्षातर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तालुक्यातील मराठा अठरापगड समाज व स्वराज्य पक्ष,शिवसेना यांनी दि.१८ रोजी सिन्नर तहसीलदारांतर्फे मुख्यमंत्र्यांना हे निवेदन दिले. संपूर्ण अतिक्रमणे न काढल्यास व छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्यावरील कारवाई न थांबल्यास आंदोलन छेडण्यात येईल.असा इशाराही या निवेदनात देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांनी रक्त सांडुन गडकिल्ले बांधले, जिंकले.जीवाची बाजी लावत लढाया जिंकत स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र व हिंदुस्थान आहे. सदर गड किल्ले यांचे पावित्र्य राखणे हा आपला धर्म आहे.तेथे होणारे अतिक्रमण व इतर गोष्टीपासुन संरक्षण करणे सरकारसह सर्व पक्ष ,राजकीय नेते व जनतेच कर्तव्य आहे. गडकिल्ल्यांवर कुणी अतिक्रमणे करत असेल तो खरा आरोपी. त्यांच्या अतिक्रमणापासुन गडकिल्ले वाचवण्यासाठी कुणी प्रयत्न करत असेल तर त्यांचा प्रत्येक मराठी माणसाला व हिंदु मराठा अठरापगड समाजाला अभिमान आहे.छत्रपती संभाजी राजे व शिवभक्तांसह स्वराज्य पक्षाने अतिक्रमण विरोधात केलेल्या आंदोलन व मागणीससिन्नरकरांचा जाहीर पाठिंबा आहे. या आंदोलनाची तातडीने दखल घेत कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने अतिक्रमणे हटवणे सुरु केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे. परंतु अतिक्रमण करणारे सोडून अतिक्रमण विरोधात आवाज उठवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशंज छत्रपती संभाजी राजे भोसले व आंदोलक यांच्यावर कारवाई करणे योग्य नव्हे. ते त्वरीत थांबवावे व सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्यात यावे.छत्रपती शिवाजी महाराज व मावळे यांचा इतिहास अबाधित ठेवावा.पुढील पिढीला ते दिशा देणारे,स्फूर्तीदायक ठरेल.असे या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर सिन्नर शिवसेना तालुकाध्यक्ष शरद तुकाराम शिंदे,
शिवाजी गुंजाळ,रामबाबा शिंदे,अर्जुन घोरपडे,संदिप लोंढे,सुरेश सानप,गणेश जाधव,बाळासाहेब सहाणे,जयश्री गायकवाड,वराडे,मोरे आदींच्या सह्या आहेत.