आ थोरात यांच्या सूचनेवरून संजय गांधी योजना कमिटीची बैठक सुरू अनेक पात्र लाभार्थ्यांना फायदा होणार
आ थोरात यांच्या सूचनेवरून संजय गांधी योजना कमिटीची बैठक सुरू
अनेक पात्र लाभार्थ्यांना फायदा होणार
संगमनेर (प्रतिनिधी)-
संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही प्रत्येक गाव व वाडी वस्तीवर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विकासाच्या योजना राबवल्या आहेत .त्याचबरोबर जास्तीत जास्त योग्य व पात्र नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरता यशोधनच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात असून अनेक दिवस रखडलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकी करता जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर आज बैठकीला सुरूवात झाली आहे
मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी शासनाच्या विविध योजना योग्य व पात्र लाभार्थींना मिळावा यासाठी यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून जनसेवकांच्या मार्फत तळागाळापर्यंत योजना पोहोचवले आहेत. या अंतर्गत संगमनेर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक, वृद्ध, निराधार, अपंग, विधवा , निराधार, परीतक्त्या अशा अनेक पात्र व्यक्तींचे फॉर्म भरून तहसील कार्यालयात जमा केले आहे. अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही बैठक न झाल्याने ही प्रकरणे रखडली आहेत. ही प्रकरणी तातडीने मंजूर करावी यासाठी यशोधन कार्यालयाच्या वतीने सातत्याने पाठपुरावाही सुरू होता.
परंतु प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे राज्याचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून संगमनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजने सह विविध शासकीय योजनांच्या बैठकी तातडीने घेऊन योग्य लाभार्थींचे प्रकरणे मंजूर करण्याच्या सूचना दिल्या.
यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ संगमनेर तालुका तहसीलदार यांना सूचना केल्याने संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.
यामुळे या बैठकीतून अनेक पात्र गोरगरीब, निराधार, वृद्ध, महिला व नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ होणार असून या गोरगरीबांच्या चेहऱ्यावर हसू फुलणार असल्याचे थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी सांगितले आहे