ताज्या घडामोडी

प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेत सिन्नर तालुका अध्यक्षपदी संदीप एकनाथ आव्हाड यांची नियुक्ती 


प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेत सिन्नर तालुका अध्यक्षपदी संदीप एकनाथ आव्हाड यांची नियुक्ती 

 

सिन्नर प्रतिनिधी 

Advertisement

दिव्यांगांचे कैवारी प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाने तसेच महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख व महासचिव रामदासजी खोत साहेब यांच्या प्रमुख उपस्थित व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकप पिल्ले राज्य महिला समन्वयक संध्याताई जाधव नाशिक जिल्हा अध्यक्ष रवींद्र टिळे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख संतोष  मानकर तसेच नाशिक ग्रामीण कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे इगतपुरी तालुका अध्यक्ष सोपान परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत नासिक येथे शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा हे संघटनेचे ब्रीद वाक्य प्रमाणे दिव्यांगांसाठी नवरात्र काम करणाऱ्यांना राज्य संपर्कप्रमुख रामदासजी खोत  व इतर मान्यवरांच्या हस्ते सिन्नर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची पत्र दिले. यापुढेही दिव्यांगासाठी असेच काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच 9/ 8/ 2024रोजी संभाजीनगर येथे दिव्यांगांसाठी बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. तरी सर्व दिव्यांग बांधवांनी व पदाधिकाऱ्यांनी संभाजीनगर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी संदीप आव्हाड यांना शाल फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रामदासजी खोत , संध्याताई जाधव, जेकाप अण्णा पिल्ले,, रवींद्र आप्पा टिळे, संतोष मानकर ,भाऊसाहेब सांगळे सोपान परदेशी इगतपुरी तालुकाध्यक्ष

जिल्हा कार्याध्यक्ष बबलू भाई मिर्झा

त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष सोमनाथ पेखळे

अंबादास कळमकर शरद नरवाडे तान्हुबाई खांडबहाले महिला तालुकाध्यक्ष

कैलास चव्हाण

आदी मान्यवर व दिव्यांग बांधव उपस्थित होते..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *