ताज्या घडामोडी

सिन्नर नगरपालिकेच्या वसुली एजंटकडून शेतकऱ्यांची लूटमार ; नाशिकच्या तुलनेत पाच पट वसुली, 


सिन्नर नगरपालिकेच्या वसुली एजंटकडून शेतकऱ्यांची लूटमार ;

नाशिकच्या तुलनेत पाच पट वसुली, 

 

शिवसेनेचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा 

 

सिन्नर प्रतिनिधी 

सिन्नरच्या भाजीबाजारात शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून नगर पालिकेच्या वसुली एजंट कडून अव्वाच्या सव्वा वसुली केली जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने तालुका शिवसेनेने ही लूटमार तात्काळ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडून मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल असा इशारा दिला आहे.

शिवसेनेचे तालुका प्रमुख शरद शिंदे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सिन्नर तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस होत असल्याने सातत्याने दुष्काळ पाडतो. त्यावर मात करुन शेतात भाजीपाला पिकवला जातो. तो माल सिन्नरच्या मंडईत विक्रीसाठी आणला जातो. बाजार आवारात नगरपालिकेचे वसुली एजन्ट शेतकऱ्यांकडून प्रती कॅरेट वीस रुपयांची पावती वसूल करतात.

नासिक मार्केटला एका पिकअपला ५ रुपये पावती तर सिन्नर मार्केटला २० रुपये प्रति कॅरेट ५० केरेट टमाटे पिकअप आणली तर १०० रु.डायरेक्ट वसुली. एजंट दादागिरी करत ही वसुली करतात.कधी १००रु. कॅरेट विकते कधी५० रु.कधी १०रुपये.५०रु.विकले तर ५० कॅरेटचे येतात २५००रू.

Advertisement

१०००रु.पावती दिली गाडी भाडे १५००रु. तर खाली शिल्लक रक्कम उरते शून्य. मग शेतकऱ्यांना हाती रहाते काय?आणि जर १०रु.केरेट गेले तर ५०केरेटचे येतात ५००रु.येतात. मग नगरपालिका एजंटला १०००रू.दयायचे कसे?गाडी भाडे मजुरी आणि शेतकऱ्यांना खाली नफा काय? असा सवाल या निवेदनात केला आहे.

१००जुडया कोथिंबीर आणली तरी १००रु.एजंट पावती फाडतो आणि १०/२०जुडया कोथिंबीर आणले तरी एजंट १००रु.पावती वसुल करतो.जुडी कधी २०कधी १०तर कधी ५रु.गेली तर पावतीचे पैसे दयायचे कसे?शेतकऱ्यांनी विरोध केला तर खेडयातील एकटया शेतकऱ्यावर सदर वसुली एजंट दादागिरी करतात कधीकधी हात उचलतात.या पठाणी वसुलीला पाठबळ कुणाचे?असा सवाल उपस्थित करुन

सदर लूटमार थांबवावी अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर तालुका प्रमुख शरद तुकाराम शिंदे पाटील पुंजाराम हारक,शिवाजी गुंजाळ,संदीप लोंढे,दत्ताजी जाधव,सुरेश सानप

चिंधु गुंजाळ,राम बाबा शिंदे,जयश्री गायकवाड,सखाराम सांगळे,दशरथ डावरे,जिवराम खुळे,फकीरा गिते,मंगला मोरे,निशा वराडे,लीला तुपे,बालाबाई पवार,काशा शिंदे,शांताबाई शिंदे आदींच्या सह्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *