हनुमान जयंती:अंजनेरी गडावरील परंपरा जपण्याचा मुख्य मान अंजनेरी ग्रामस्थांनाच
हनुमान जयंती: अंजनेरी गडावरील परंपरा जपण्याचा मुख्य मान अंजनेरी ग्रामस्थांनाच
Advertisement
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी
23 एप्रिल मंगळवार रोजी चैत्र पौर्णिमेला मंगळवारी हनुमान जयंती उत्सव अंजनेरी गड येथे होणार आहे. अंजनेरी गड हेच हनुमानाचे जन्मस्थान आहे हे अलीकडे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. 23 तारखेला पहाटे हनुमान जयंती उत्सव साजरा होणार आहे
अंजनेरी गडावरील परंपरा जपण्याचा मुख्य मान अंजनेरी ग्रामस्थांना पूर्वीपासून आहे आणि तो पुढेही राहणार आहे.
अंजनेरी गडावर भाविक येतात आरती पूजापाठ करतात. उत्सव साजरा करतात. व परत जातात.
ग्रामपंचायत किंवा अंजनेरी ग्रामस्थांशी संपर्क साधतात.
अलीकडेच एका मंडळाने आपणच मुख्य उत्सव भरवतो असे वातावरण निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थ यांनी नाराजी व्यक्त करून त्याविषयी शासनाकडे निवेदनही दिले आहे.
40 वर्षांपासून अंजनेरी हनुमान जन्मस्थान विकास समिती कार्यरत आहे.अंजनेरी ग्रामपंचायत सलग्न मंडळ यात आहे.सरपंच श्रीमती जिजाबाई मधुकर लांडे उपसरपंच सौ अनिता चव्हाण ,वन समिती अध्यक्ष व माजी उपाध्यक्ष पंडित चव्हाण दिलीप चव्हाण अरुण शिंदे भाऊसाहेब लांडे हे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पूजा आरती करण्यास आमची कोणासही अडचण नाही असे ही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
प्रसिद्ध अशोक बाबा उर्फ ब्रम्हगिरी महाराज हे गेले 38 वर्ष अंजनेरी येथे गडावर राहतात. त्यांचे आश्रमात बाल हनुमान मंदिर देखील आहे.