अमृतवाहिनी एमबीएतील अंकुर 2k हायटेक मॅनेजमेंट ला प्रोत्साहन देणारा- मा. आ डॉ. तांबे
अमृतवाहिनी एमबीएतील अंकुर 2k हायटेक मॅनेजमेंट ला प्रोत्साहन देणारा- मा. आ डॉ. तांबे
संगमनेर ( प्रतिनिधी)–
आधुनिक युगात व्यवस्थापन शास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. कार्पोरेट क्षेत्रातील हायटेक मॅनेजमेंट हे प्रत्येक विद्यार्थ्याला अधिक सोयीचे व सोपे व्हावे याकरता अमृतवाहिनी एमबीए राबवण्यात आलेल्या अंकुर 2k हा उपक्रम अत्यंत प्रोत्साहन देणारा असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले आहे.
अमृतवाहिनी एमबीएच्या वतीने प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत पर टू के 2024 या कार्यक्रमांतर्गत विविध मान्यवरांचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ते बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर अमरावती कॉलेजचे डील डॉ. शशिकांत थोरात ,रिलायबल ऑटो टेक चे अतुल बोरगावकर ,कॉस्मो फिल्मचे राजेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, संचालक डॉ बी एम लोंढे समन्वयक डॉ.एल डी शहा आधी उपस्थित होते.
अंकुर टू के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या यामधून टॅलेंट सर्च करून मिस्टर प्रेशर आणि मी प्रेशर अशा दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली
तर यावेळी बोलताना माजी आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात असूनही अमृतवाहिनी एमबीएने आपला दर्जा टिकवला आहे व्यवस्थापन शास्त्र हे कार्पोरेट क्षेत्रातील सर्वात महत्वाचे शास्त्र आहे. विद्यार्थ्यांना अधिक सोप्या पद्धतीने मॅनेजमेंट कळावे याकरता सातत्याने विविध उपक्रम होत असून अंकुर टू के मधून हे मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना स्वतःमध्ये अधिकाधिक वापरण्यासाठी वाव मिळणार आहे
तर डॉक्टर शशिकांत थोरात म्हणाले की व्यवस्थापनाची तंत्र यादी व्यवस्थापन कला याकरता विद्यार्थ्यांनी सातत्याने नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत अमृतवाहिनी संस्थेने विद्यार्थ्यांना अत्यंत अद्यावत सुविधा निर्माण करून दिले असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले
तर अतुल बोरगावकर म्हणाले की, नवनिर्मिती ही विद्यार्थ्यांकडे असली पाहिजे आणि त्याचबरोबर कमी वेळ कमी श्रमात जास्त उत्पादन हे सूत्र जो व्यक्ती करील त्याचे मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये महत्त्व वाढत असते
यावेळी राजेश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ बी एम लोंढे यांनी केले तर डॉ शहा यांनी आभार मानले