गुजरात भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष धर्मेंद्र भाई पांचाल यांची ठाण गाव भाजप कार्यालयात सदिच्छा भेट बूथ प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांना आगामी विधानसभेसाठी मार्गदर्शन
गुजरात भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष धर्मेंद्र भाई पांचाल यांची ठाण गाव भाजप कार्यालयात सदिच्छा भेट
बूथ प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांना आगामी विधानसभेसाठी मार्गदर्शन
ठाणगाव प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे भारतीय जनता पार्टीचे गुजरात येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष आणि प्रवासी नेते धर्मेंद्र भाई पंचाल यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ठाणगाव भारतीय जनता पार्टीच्या यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. धर्मेंद्र भाई पंचाल यांनी कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुका संदर्भात पक्ष बळकटीसाठी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये, महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे त्याचबरोबर सर्व बूथ प्रमुख व गण प्रमुख यांना दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार कराव्या याविषयी चर्चा केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना घरोघरी पोहोचवाव्या आणि बूथ रचना व्यवस्थित करावी, याबाबत कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या. आपल्या परिसरात लाडकी बहीण योजनेची पूर्ण अंमलबजावणी करण्यात यावे, महिलांना व्यवस्थित माहिती देऊन या योजनेचा लाभ करून द्यावा, अशी सूचना देण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टी गुजरात ओ बी सी मोर्चा अध्यक्ष धर्मेंद्र भाई पंचाल , सिन्नर विधानसभा प्रभारी जयंतराव आव्हाड , सिन्नर भारतीय जनता पार्टी पश्चिम अध्यक्ष बहिरु दळवी , सिन्नर भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कुराडे , सिन्नर भारतीय जनता पार्टी संघटना सरचिटणीस रामदास भोर, सिन्नरभारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी तालुका अध्यक्ष मोहन आव्हाड, अशोक काकड, हिवरे सरपंच केशव सहानी, भाजप नेते वामनराव पवार, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपजिल्हा अध्यक्ष समाधान केकान, माजी पोलीस अधिकारीअशोक काकड,बाळासाहेब शिंदे अडवडी सरपंच राजेंद्र बिन्नर,, नारायण धोंगडे, युवा तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे, सुनील गोसावी, भाऊसाहेब गुंड, सनी लियोनी, भाऊ शिंदे, नितीन पवार, दिलीप काकड,यज्ञेश काळे राजेंद्र काकड, के एल शिंदे, भरत जाधव, भारत कातोरी, गणेश गोसावी, मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.