कहांडळवाडी खून प्रकरणातील दोन फरार संशयित स्थानिक गुन्हेशाखे कडुन जेरबंद
कहांडळवाडी खून प्रकरणातील दोन फरार संशयित स्थानिक गुन्हेशाखे कडुन जेरबंद
सिन्नर प्रतिनिधी
वावी पोलीस ठाणे हददीत दि.३ एप्रिल रोजी कहांडळवाडी शिवारात झालेल्या खून प्रकरणातील फरार असलेले दोन संशयित स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत. सिन्नर येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात कुजलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह मिळून आला होता. सदर मृददेहाचे बाजुला रक्ताने माखलेला दगड मिळून आला होता.या अज्ञात मयताची ओळख पटविली असता तो दिलीप भाउसाहेब सोनवणे रा. चिंचोली गुरव ता संगमनेर जि. अहमदनगर येथील असल्याची माहीती मिळून आली होती. मयताच्या डोक्यावर, मानेवर वार करून त्यास ठार मारलेले होते. त्याप्रमाणे वावी पोलीस ठाणे येथे गुर नं १४८/२०२४ भादविक ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान मयत दिलीप सोनवणे याचेसोबत राहणारा त्याचा मावसभाऊ कृष्णा उर्फ पोपट जालींवर जाधव रा. चिंचोली गुरव ता संगमनेर व मित्र अजय सुभाष शिरसाठ रा. चास ता सिन्नर यांनी दिलीप सोनवणे याचा खुन केल्याची माहीती प्राप्त झालेली होती. गुन्हा घडल्यापासुन कृष्णा जाधव व अजय शिरसाठ हे फरार होते. व त्यांचे मोबाईल देखील बंद येत होते. वावी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांकडुन त्यांचा शोध सुरू होता. आज दि.०५/०४/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राज् सुर्वे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की कृष्णा जाधव व अजय शिरसाठ हे कसारा रेल्वे स्टेशन जि ठाणे परिसरात फिरत आहेत. मिळालेल्या माहीतीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक व इगतपुरी पोलीस ठाणेकडील पथक यांनी कसारा रेल्वेस्टेशन परिसरात सापळा रचुन कृष्णा जाधव व अजय शिरसाठ यांना शिलाफिने ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेले आरोपी कृष्णा उर्फ पोपट जालींदर जाधव, वय-२२ वर्षे रा. चिंचोली गुरव ता संगमनेर व अजय सुभाष शिरसाठ, क्य-२३ वर्षे रा. चास ता सिन्नर यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिली. हा खून अनैतिक संबंधाच्या संशयातुन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींना पुढील तपासकामी वावी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
नाशिक ग्रामिण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, व उपविभागीय पोलीस अधिकारी, निफाड विभाग निफाड निलेश पालवे, यांचे मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोलीस अंमलदार नवनाथ सानप, विनोद टिळे, विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले,, प्रदीप बहीरम, चालक विकी म्हसवे व इगतपुरी पोस्टे ए एस आय गणेश परदेशी, पोशि अभिजीत पोटींदे यांच्या पथकाने या संशयितांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे.