मराठा रॅलीच्या पार्श्वभूमीवर १३ ऑगस्टला शहरात वाहतूक मार्गात बदल ; अधिसूचना :पार्किंगसह पर्यायी मार्ग निश्चित
मराठा रॅलीच्या पार्श्वभूमीवर १३ ऑगस्टला शहरात वाहतूक मार्गात बदल ;
अधिसूचना :पार्किंगसह पर्यायी मार्ग निश्चित
नाशिक प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांच्या १३ ऑगस्टच्या शांततापूर्ण मराठा रॅलीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने वाहतूक निर्बंध अंमलात आणणेसाठी अधिसुचना प्रसिध्द केली आहे.
वाहतूकीस ‘प्रवेश बंद’ मार्ग :-
स्वामीनारायण चौका पासुन ते कन्नमवार पुल पावेतो मार्गावर सर्व प्रकारच्या वाहतूकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे. मिर्ची हॉटेल सिग्नल ते स्वामीनारायण चौका पावेतो मार्गावर सर्व प्रकारच्या वाहतूकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
संतोष टी पॉईंट ते दिंडोरी नाका ते मालेगाव स्टॅण्ड पावेतो मार्गावर सर्व प्रकारच्या वाहतूकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे. रविवार कारंजा- सांगली बँक सिग्नल मेहेर सिग्नल ते सिबीएस पावेतो दोन्ही बाजुकडील मार्गावर सर्व प्रकारच्या वाहतूकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
मोर्चाच्या मार्गावर दिनांक १३/०८/२०२४ रोजीचे सकाळी ०८:०० वा पासुन ते मराठा मोर्चा संपेपर्यंत सर्व
प्रकारच्या वाहनांना वाहतूकिस “प्रवेश बंद” करण्यात येत आहे. सदर मार्गाने जाणा-या वाहनचालकांनी खालील पर्यायी
मार्गाचा वापर करावा.असे आदेशीत करण्यात आले आहे.
-: वाहतुक पार्किंग व्यवस्था :-
संभाजीनगर रोड कडुन येणारी वाहने तपोवन मिलगीरी बाग येथे पार्क होतील. पेठरोड-दिंडोरीरोड कडुन येणारी वाहने शरदचंद्र मार्केट पेठरोड येथे पार्क होतील.
Advertisementघोटी इगतपुरी मुंबई कडुन येणारी वाहने महामार्ग बसस्थानका शेजारील मोकळे जागा येथे पार्क होतील.त्रंबकरोड कडुन येणारी वाहने गोल्फक्लब मैदान येथे पार्क होतील.
गंगापुर गावाकडुन येणारी वाहने डोंगरे मैदान व मराठा विद्याप्रसारक कॉलेज येथे पार्क होतील.
-: वाहतूकीस ‘पर्यायी मार्ग’ :-
छ. संभाजीनगर कडुन येणारी समिती सिग्नल पेठ रोड मार्गे जातील.वाहतूक हि मिर्ची हॉटेल सिग्नल येथुन अमृतधाम.
धुळे कडुन नाशिक शहरात येणारी वाहतूक ही अमृतधाम मार्गे तारवाला चौक रोड मार्गे शहरात जातील. कृषी उत्पन्न बाजार समिती सिग्नल – पेठ तारवाला चौक- कृषी उत्पन्न बाजार.
दिंडोरी नाक्याकडून शहरात जाणारी वाहतूक ही पेठ नाका मखमलाबाद नाका रामवाडी पुल मार्गे जातील.दिंडोरी नाक्या कडुन बाहेर जाणारी वाहतूक ही दिंडोरी नाका, तारवाला चौक हिरावाडी मार्गे जातील.
व्दारका सर्कलकडुन कन्नमवार ब्रिजकडे पुलाखालुन जाणारी वाहतूक हि व्दारका उड्डाण पुलावरून जाईल. सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमनदलाची व अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहने यांना लागु राहणार नाही.वरील मार्गात व वेळेत परिस्थीतीनुसार ऐनवेळी कोणतीही पुर्वसुचना न देता बदल करण्याचे अधिकार राखुन ठेवण्यात आलेले आहेत.
तरी नाशिक पोलीस आयुक्तालयातील सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घ्यावी. सदरील अधिसूचनेचे उल्लंघन करणा-यांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ११९/१७७, १२२/१७७, प्रमाणे व मुंबई पोलीस अधिनियमा
१९५१ मधील कलम १३१ (चार) (पाच) तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असा इशारा या अधिसूचनेत दिला आहे.