पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील शांतता रॅली मार्गाची पाहणी
पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील शांतता रॅली मार्गाची पाहणी
नाशिक प्रतिनिधी
येत्या १३ ऑगष्ट रोजी नाशिकला मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील रेलीचा समारोप आहे.
या निमित्ताने नाशिकमध्ये जरांगे पाटील यांच्या रॅली मार्गाची पाहणी नाशिकचे पोलीस अधिकारी व सकल मराठा समाजाचे मराठा सेवकांनी केली.
दरम्यान दिनांक १३ ऑगष्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात “मराठा आरक्षण शांतता रैली” नाशिकच्या तपोवन पासून आडगावं नाका,तेथून निमाणी -पंचवटी कारंजा, मालेंगावं स्टॅन्ड मार्गे रविवार कारंजा ते रेडक्रॉस सिग्नल-मेहेर-शिवतीर्थ ते सिबिएस हा मार्ग पाहून येथे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना व नियोजनात्मक संवाद, नियोजनही यावेळी करण्यात आले.
यावेळी नाशिकचे पोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण,सहाय्यक आयुक्त श्रीमती पद्मजा बढे, मधुकर कड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी पोलीस स्टेशन), सचिन खैरनार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आडगाव पोलीस स्टेशन), राजेश हांडे (पोलीस निरीक्षक, वाहतुक विभाग)पोलिस अधिकारी व सकल मराठा समाजाचे मराठा सेवक नाना बच्छाव,करण गायकर,आशिष हिरे, भारत पिंगळे, योगेश कापसे, सचिन पवार, खंडू आहेर विजय वाहूळे,संदीप हांडगे देवराम आवारे, सुभाष गायकर,राम निकम, मेघराज भोसले, भारत पिंगळे, वैभव दळवी, विलास आवारे,महेंद्र बेहेरे,निलेश ठुबे, एकता खैरे, रोहिणी उखाडे,रेखा जाधव, रागिनी आहेर व मराठा सेवक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.