*नवीन कांदा निर्यातीची अधिसूचना नाही,,, जुन्याच कडीला आलाय उत*,,,, *कुबेर जाधव*
*नवीन कांदा निर्यातीची अधिसूचना नाही,,, जुन्याच कडीला आलाय उत*,,,,
*कुबेर जाधव*
नासिक
केंद्र शासनाने९९, हजार १५० टन कांद्याची निर्यात सुरू करणर आहे अशी बोगस बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. केंदिय आरोग्य राज्यमंत्री ना भारती पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की मी अनेक वेळा वाणिज्य मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्यामुळे केंद्र सरकारने ९९,००० मे टन कांद्याची निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे,माझी ना भारती ताईंना कळकळीची विनंती आहे की त्यांनी तात्काळ निर्याती संदर्भातले नोटीफिकेशन विनाविलंब ज्या दिवशी तुम्ही घोषणा केली त्या तारखेची निर्याती संदर्भातली अधिसूचना प्रसार माध्यमातुन जाहीर करावी,मागच्या महिन्यात वेगवेगळ्या देशांत काही प्रमाणात मर्यादित स्वरूपात निर्यात कोटा जाहीर करण्यात आला होता, तोही N CNl या सरकारी संस्थे मार्फत निर्यात होनार आहे,त्यात नवीन काही नाही, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील जनतेचा रोष कमी करण्यासाठी जुनिच बातमी पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आली आहे,कांदा उत्पादकांनी नाराजी दूर व्हावी, मते मिळवण्यासाठी मोदी सरकारचा हा नविन डाव असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी व्यक्त केले आहे. गुजरातमधून पांढरा कांदा निर्यात करण्याचा निर्णय झाल्या नंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक नाराज झाले होते. याचा परिणाम सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानावर होऊ नये म्हणून केंद्र शासनाने ९९,१५० टन कांदा निर्यात करणार असल्याची बोगस माहिती प्रसारित केली आहे. प्रत्यक्षात २०२३ पासून,आज अखेर पर्यंत विविध देशांना निर्यात केलेल्या कांद्याची ही एकूण गोळा बेरीज आहे. नवीन कांदा निर्याती बाबत कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही.निर्यातीसाठी शेतकऱ्यानं कडून कांदा खरेदी होत नाही. या निर्यातीसाठी टेंडर काढले जाते, मोठ्या प्रमाणात*एन सी ई एल* मार्फत कांदा निर्यात केला जात आहे,
गुजरात मधील काही कांदा व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पांढरा कांदा खरेदी करून ठेवला आहे, परंतू निर्यात बंदी असल्यामुळे कांदा निर्यात होऊ शकत नव्हता. केंद्र सरकारात सलोख्याचे संबंध असलेल्या काही व्यापाऱ्यांनी तोडपाणी करून निर्यातीची परवानगी घेतली आहे,
गुजरात मधुन मोठ्या प्रमाणात कांद्याची तस्करी होत आहे,,
निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर पडले आहेत,. कांदा उत्पादक प्रचंड नाराज आहेत. ही नाराजी दूर करण्यासाठी कांदा उत्पादकांची दिशाभूल केली जात आहे. नवीन कांदा निर्यातीसाठी कोणताही आदेश जारी केलेला नाही. कांदा पट्ट्यात सध्या निवडणूक प्रचार जोमाने सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक, नगर धुळे,नंदुरबार, जळगाव, जिल्ह्यातील मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी मोदी सरकारने प्रसार माध्यमांद्वारे खोटी माहिती प्रसारित केली आहे. ही शेतकऱ्यांची चक्क दिशाभूल आहे. कांदा उत्पादकांच्या दुरावस्थेला मोदी सरकारचे शेतकरी विरोधी धोरण जबाबदार आहे. शेतकऱ्यांनी मतदान करताना याचा विचार करून मतदान करावे. शेतकरीविरोधी सरकारचा पराभव करणे गरजेचे आहे. कांदा उत्पादक सुद्धा सरकारला त्याची जागा दाखवुन त्यांचा पराभव करू शकतो हे मत पेटीतून दाखवून देण्याची वेळ आली आहे ,,,*कळावे आपला विश्वासू*कुबेर जाधव*समन्वयक*स्वाभिमानी शेतकरी संघटना*