ताज्या घडामोडीराजकीय

शिर्डी मतदार संघात बसपाचा हत्ती वंचितच्या मदतीला


शिर्डी मतदार संघात बसपाचा हत्ती वंचितच्या मदतीला

नाराज पदाधिकारी,कार्यकर्ते उत्कर्षा रुपवतेंच्या प्रचाराची धुरा घेणार हाती

हिवरगाव पावसा प्रतिनिधी:

Advertisement

बहुजन समाज पार्टी कडून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदार संघात रामचंद्र जाधव आणि दक्षिण नगर मधून उमाशंकर यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात उमेदवारी देताना स्थनिक पदाधिकारी,कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता जिल्हा प्रभारी,झोन प्रभारी यांनी मनमानी करून परस्पर उमेदवारी जाहीर केली. शिर्डी आणि दक्षिण नगर मतदार संघात जनसंपर्क नसलेले उमेदवार दिल्याने अहमदनगर जिल्ह्यातील बसपाचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघातील नाराज आजी – माजी पदाधिकारी,कार्यकर्ते उत्कर्षा रुपवतेंच्या प्रचारात सहभागी होऊन प्रचाराची धुरा हाती घेणार आहे.बसपाचे प्रशिक्षित केडरबेस टिम उत्कर्षा रुपवतेंच्या प्रचारात उतरल्यामुळे वंचितला हत्तीचे बळ मिळणार आहे.आणि आंबेडकरी मतांची विभागी टाळल्यामुळे उत्कर्षा रुपवतेंचा विजय रथ संसदेत पोहोचायला मोठी मदत होणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील २५ वर्षांपासून बहुजन समाज पार्टीचा प्रचार प्रसार करून एक एक कार्यकर्ता निर्माण केला.तसेच एकाच वार्ड मधून बसपाचे चार नगर सेवक एकाच वेळी निवडून आणले आणि महाराष्ट्रातील अहमदनगर शहरात इतिहास घडविला.मागील महानगरपालिका निवडणुकीत ज्यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक कामगिरी केली ते वरिष्ठ पदाधिकारी संजय डहाणे आणि इतर निष्ठावंत पदाधिकारी यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य व झोन प्रभारी यांनी तसेच इतर वरिष्ठ पदाधिकारी यांनी मनमानी करत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता दोन्ही मतदार संघात परस्पर उमेदवारी जाहीर केले आहे.कोणताही जनसंपर्क नसलेले,कार्यकर्त्यांचे संघटन नसलेले शिर्डीत रामचंद्र जाधव आणि दक्षिण नगर मधून बसपाचे चार नगरसेवक भाजपा च्या दावणीला बांधणारे उमाशंकर यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे अनेक वर्षांपासून बसपाचे प्रामाणिकपणे काम करणारे पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी शिर्डी मतदार संघात वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते या अभ्यासू,कायद्याची उत्तम ज्ञान,सामजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आणि उत्कृष्ट जनसंपर्क,तळागाळातील घटकांच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेले नेतृत्त्व आहे.त्यांचा महिला वर्गात चांगला संपर्क आहे.महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घेतात.असे नेतृत्व निवडून आल्यास महिला अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल.उत्कर्षा रुपवते यांना बहुजन समाजातील सर्वच समाज घटकांचा पाठींबा मिळत आहे.त्यात आंबेडकर चळवळीतील मोठा राजकीय पक्ष असलेल्या बसपाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाल्याने बौध्द मतांची विभागणी होणार नाही.तसेच शिर्डी मतदार संघ आणि दक्षिण नगर या दोन्ही मतदार संघातील बसपाचे आजी- माजी पदाधिकारी,कार्यकर्ते उत्कर्षा रुपवते यांची भेट घेऊन वाड्या वस्त्यांवर प्रचाराला सुरुवात करणार आहेत.अशी माहिती बसपाचे वरिष्ठ पदाधिकारी संजय डहाणे यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *