विराट शक्तीप्रदर्शन करत स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा अर्ज दाखल
विराट शक्तीप्रदर्शन करत स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा अर्ज दाखल
नाशिक : प्रतिनिधी
निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी भारत माता की जय,जय श्रीराम,जय बाबाजी असा जयघोष करत प्रचंड..प्रचंड शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या जय बाबाजी भक्त परिवाराने ‘लढा राष्ट्र हिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा’ अशा विचारातून शांतीदुतांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नाशिककरांच्या मनामनात शांतीगिरीजी महाराजांचे देशभक्तीचे विचार पोहचवले.’अब की बार दस लाख पार’ अशा ध्येयाने प्रेरित होऊन सर्वाधिक मतदारांपर्यंत पोहचले आणि यापुढेही अधिक गतीने प्रचार सुरू राहणार आहे.भक्त परिवाराच्या वतीने काल शहरातील गोदावरी तीरावरील गौरी पटांगण येथून जोरदार शक्तिप्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मौनव्रतात विराट रॅली काढण्यात आली.हजारो नागरिकांची उपस्थिती असतांनाही प्रचंड शांततेत ही रॅली संपन्न झाली.रॅली शिस्तबद्धरित्या काढण्यात आली.रॅली दरम्यान स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज,महारुद्र हनुमान,चांदीचा गणपती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.रामकुंडावर विधिवत गांगांपुजन करून भगवान कपालेश्वर महादेवांना नतमस्तक होऊन रॅलीस प्रारंभ करण्यात आला. हाती भगवे ध्वज,बॅनर वर लढा राष्ट्र हिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा,नाशिकचा आवाज शांतीगिरीजी महाराज,शेतकऱ्यांचा,व्यापाऱ्यांचा,
नोकरदारांचा आवाज,विद्यार्थ्यांचा, नारीशक्तीचा आवाज,गोरगरिबांचा, मजूरांचा आवाज शांतीगिरीजी महाराज असे फलक झळकत होते.रॅलीत नाशिक शहरातील व आश्रामीय संत,भाविक व हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.