क्राईम

१५ वर्षीय भाग्य धवन याचा राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत डंका;  तीन सुवर्णपदकांची कमाई करीत महाराष्ट्रा सह नाशिकची उंचावली मान


 

१५ वर्षीय भाग्य धवन याचा राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत डंका;

 तीन सुवर्णपदकांची कमाई करीत महाराष्ट्रा सह नाशिकची उंचावली मान

 

नाशिक प्रतिनिधी :

नाशिकचा भूमिपुत्र भाग्य कुलदीपराज धवन याने राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकारात तीन सुवर्ण पदकं पटकावून महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

 

तो अवघ्या १५ वर्षाचा असून सब ज्युनियर कॅटेगिरी मध्ये ४९० किलो वजन उचलणारा तो पहिली भारतीय स्पर्धक ठरला आहे.

Advertisement

बिलासपूर (छत्तीसगड) येथे 31 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 दरम्यान वर्ल्ड पावरलिफ्टिंग फेडरेशन संलग्न युनायटेड पावरलिफ्टिंग असोसिएशन व बिलासपूर जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, छत्तीसगड यांच्या वतीने आयोजित द मेन/वुमन SUB-JR/JR/SR/MASTER I/II/III नॅशनल क्लासिक/इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाग्य धवन याने चमकदार कामगिरी करत तिन्ही प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

भाग्य धवन याने सब ज्युनिअर कॅटेगिरी मध्ये बेंचप्रेस प्रकारात 116.5 कि.ग्रा. बॉडीवेट, 125 कि.ग्रा. वेट क्लासमध्ये 110 कि.ग्रा. वजन उचलून प्रथम क्रमांक मिळवला.

पॉवरलिफ्टिंग प्रकारात स्क्वॅट – 180 कि.ग्रा., बेंचप्रेस – 110 कि.ग्रा., डेडलिफ्ट – 220 कि.ग्रा. अशा एकूण उल्लेखनीय कामगिरीने सुवर्णपदक पटकावले.

डेडलिफ्ट प्रकारात 220 कि.ग्रा. वजन उचलून पुन्हा एकदा सुवर्णपदकाची कमाई केली.

या कामगिरीमुळे भाग्य धवन यांनी राष्ट्रीय स्तरावर म

हाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला असून त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *