आपलाच मंत्री:आता मतदार, परिवहन मंत्र्यांना जेलमध्ये धाडणार का? सामान्य जनतेच्या मनातील शंकेखोर लाटा
आपलाच मंत्री:आता मतदार, परिवहन मंत्र्यांना जेलमध्ये धाडणार का?
सामान्य जनतेच्या मनातील शंकेखोर लाटा
कालच जळगावचा आरटीओ आणि त्याचा पंटर इन्स्पेक्टर ची पोस्टींगसाठी लाच घेतांना पकडला गेले.हे पकडले जाणे काही पहिले उदाहरण नाही.खूप मोठी यादी आहे.पंटरची इतकी हिंमत नसते,जर आरटीओ सांगत नसेल तर! आरटीओची हिंमत नसते जर परिवहन मंत्री आणि पालकमंत्री सांगत नसतील तर.आणि हा मंत्री म्हणजे कोण? तुम्ही आपण लाच घेऊन निवडून दिलेला राजमान्य चोर.हा राजकीय चोर चोरी करीत नाही,असे जर कोणी समजत असेल तर तो जनावर असू शकतो.तरीही त्यांचेकडून पैसे घेऊन मत देतो , यापेक्षा जनावर बरे! ही जनावरे आमच्या अवती भवती शेजारी आहेत.ते वर मान करून सांगतात, आप्पाने आम्हाला इतके दिले.भाऊने आम्हाला जास्त दिले.म्हणून आम्ही भाऊला मतदान केले.असे सांगताना लाज लज्जा शरम वाटत नाही.असा बेशरम माणूस आणि बाई जेंव्हा मत विकून येतो तर आमदार ही तसाच पैदा होईल.याच आमदारांमधून एक परिवहन मंत्री बनतो आणि दुसरा पालकमंत्री.ही कोणाची पैदास आहे?ही भ्रष्टाचारातून जन्माला आलेली पैदास आहे.याला तो आरटीओ किंवा पंटर जबाबदार नाही.आपलेच मतदार बंधू आणि बहिणी.असे किती बंधू आणि बहिणी या मत विक्रीची चीड मानतात? क्वचितच!
मतदारांनी केलेल्या भ्रष्टाचारातून आमदार पैदा होतो.त्यातून मंत्री पैदा होतो.असा मंत्री खरोखरच प्रामाणिक असेल का? शक्यच नाही.तो पालकमंत्री बनण्यासाठी मुख्यमंत्रीला वीस कोटी देतो तर ती दक्षिणा असते का?ती असते वसुलीची ठेकेदारी.मुख्यमंत्री त्याला शपथ देतांना परवाना पण देतो.जा,पांच वर्षे जनतेची लुटमार कर.कोणी तक्रार केली तर मी आहे बसलेला.मी सांगेन,सगळे हिरवे बोर्ड सारखेच असतात.आम्ही बसलो आहोत ना!
असेच उत्तर मला एकनाथ शिंदे कडून मिळाले होते.म्हणे माझ्या सोबत एकही आमदार प्रामाणिक नाही.तर मग कोणाला मंत्री बनवू?(एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील या मजकूरला आपली दुनियादारी दुजोरा देत नाही, तो लेखकाचा स्वानुभव असू शकतो.)
मी हे उत्तर जाहीर केले.लिहीले.बोललो.पण याबाबत उद्धव ठाकरे किंवा शरद पवार किंवा नाना पटोले यांनी चकार आक्षेप घेतला नाही.कारण यांची निर्मिती सुद्धा अशाच लाचखोरीतून झाली होती.जर हे लाचखोर नसते, प्रामाणिक असते तर यांनी शिंदेंना फाडून खाल्ले असते.पण हे त्या लायकीचे नव्हतेच.यांना फक्त सत्ता गेल्याचे दुःख होते.जनता लुटली गेल्याचे तसूभरही दुःख वाटले नाही.आता , ईव्हिएम मुळे युती निवडून आली, आम्ही पडलो असे रडत आहेत.अश्वत्थामा सारखे जखमेवर तेल मागत आहेत,कडे कपारी,दऱ्या पहाडी.
आरटीओ दिपक पाटील आणि त्याचा पंटर हा परिवहन मधील हिमनगाचे टोक आहे.खरा चोर तर आपला परिवहन मंत्री आणि पालकमंत्री आहे.ज्याच्या स्वागतासाठी राज्यपाल, प्रधानमंत्री, गृहमंत्री मु़ंबईत हजर झाले आहेत.आशिर्वाद द्यायला.जा बेटा,जितना लुटना है उतना लुट ले.तेरा हिस्सा तू ले ले,मेरा हिस्सा मुझे पहुंचा दे.
आरटीओचा पंटर पकडला गेला.त्याने आरटीओ प्रधान दिपक पाटीलचे नांव सांगितले.आता दिपक पाटीलने सुद्धा परिवहन मंत्री आणि पालकमंत्र्यांचे नांव सांगावे.एफ आय आर मधे नोंदवावे.याचा चांगला परिणाम असा होईल,हे दोन्ही मंत्री पुन्हा आसामच्या जंगलात पळून जातील.कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन लपतील.पण दिपक पाटीलने इतकी हिंमत केली पाहिजे.जर तो एकटा लाचखोर नसेल तर!
आता नोकरांनी, अधिकाऱ्यांनी लाचखोरीची जबाबदारी एकट्यावर घेऊ नये.ज्यांनी लाचखोरी करायला सांगितली त्यांच्या गळ्यात मारली पाहिजे.तर मग, पुन्हा कोणी मंत्री हे धंदे करणार नाहीत.मला वाटते,हाच एक पर्याय उरला आहे.ज्याचे शेवटचे टोक म्हणजे तुमचा आमदार आहे.ज्याला मतदार एक एक दगडांनी ठेचून काढू शकतो,जसा एक एक मत देऊन निवडून दिला आहे.
अण्टिकरप्शन, पोलिस, कोर्ट यातून काहीच इलाज होत नाही.सर्वांना चोर,लाचखोर आवडतात.लांचखोर बाय इज्जत,बा मुलाहिजा सुटून जातात.बातमी जुनी होते.लोक विसरून जातात.पुन्हा नवीन लाचखोर पकडण्याची वाट पाहातात.आज दिपक आहे.उद्या प्रकाश असेल.परवा विकास असेल.जो नरेंद्र मोदींना अपेक्षित आहे.
पोलिस अधिकारीने डान्सबार ची वसुली केली.म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोदींनी जेलमध्ये टाकले.तर मग आता आरटीओ ने लाचखोरी केली तर परिवहन मंत्री आणि पालकमंत्री ला जेलमध्ये का टाकत नाहीत?कारण देशमुख मोदींना लगान देत नव्हते , म्हणून का?
लाचखोर नोकर आणि पंटर वर पोलिस आणि कोर्ट कारवाई करतील.न करतील.पण मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री आजच दोन्ही मंत्र्यांना विना चौकशी जेलमध्ये टाकू शकतात.जसे संजय राऊत,अनिल देशमुख , अरविंद केजरीवाल,मनीष सिसोदिया यांना विना चौकशी जेलमध्ये टाकले होते.का नाही टाकत? कळेल का?
… शिवराम पाटील
९२७०९६३१२३
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
लेखकाने व्यक्त केलेल्या भावनांशी आपली दुनियादारी सहमत आहेच. किंबहुना आपली दुनियादारीच्याही याच भावना आहेत. म्हणूनच प्रसिद्धी देत आहोत तथापी प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच. तो इथेही आहे. या अपवादानेच व्यवस्थेची प्रतिष्ठा कायम राखून लोकशाही जिवंत ठेवली आहे. अशा अपवादाला सलाम…