सपोनि सत्यवान पवार यांच्या पथकाची चाणाक्ष पोलिसींग .,….. भिकारी महिलेने पळवलेले बाळ केले आईच्या स्वाधीन
सपोनि सत्यवान पवार यांच्या पथकाची चाणाक्ष पोलिसींग
.,…..
भिकारी महिलेने पळवलेले बाळ केले आईच्या स्वाधीन
आपली दुनियादारी नाशिक
भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार आणि त्यांच्या पथकाने दाखवलेले प्रसंगावधान आणि स्मार्ट पोलिसिंगने एका चिमुकलीचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवले. पोलीस ठाणे हद्दीत अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा अनुषंगाने भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले होते त्या अनुषंगाने हे पथक आपल्या हद्दीत गस्त घालीत होते.यावेळी गुन्हे शोध पथकाचे पोह नरेंद्र जाधव ,पोह संदीप शेळके, पोना लक्ष्मण ठेपने, पोना महेशकुमार बोरसे यांना पिंपळ चौकात एक भिकारी महिला एक वर्षाच्या लहान बाळाला घेऊन आडोशाला भीक मागत उभी असल्याचे दिसले. तिचे एकूण राहणीमान, वर्तन लक्षात घेता तिच्या जवळ असलेल लहान बाळ हे तिचे नसल्याचा संशय पोलिसी नजरेने अचूक टिपले.संशय बळावल्याने सदर महिलेची गुन्हे शोध पथकाने चौकशी केली असता ती उडवा उडवीची उत्तरे देऊ लागली तसेच तिच्या ताब्यातील असलेले बाळ हे मुलगा असल्याचे सांगितले.पथकाने पाहणी केली असता सदर बाळ हे मुलगा नसून मुलगी असल्याचे समजल्याने सदर महिलेने बाळ कुठून तरी पळून आणल्याचा संशय पक्का झाला.काही तरी घोटाळा आहे याची पक्की खात्री झाल्यानंतर तिच्याकडे कौशल्याने विचारपूस केली असता तिने असता ते बाळ रामकुंड पंचवटी येथून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पळविल्याचे सांगितले.खातरजमा करण्याच्या उद्देशाने पथकाने पंचवटी पोलीस ठाण्याशी संपर्क करून माहिती घेतली असता त्यांनीही सदर माहितीला दुजोरा दिला. सदर महिला व लहान बाळ यांना पुढील तपास कामी पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले. सोनू विकी कांबळे,वय 1 वर्षे,असे या चिमुकलीचे नाव असून तीचे पालक बळी मंदिर चक्रधर नगर, जत्रा हॉटेल आडगाव, नाशिक या ठिकाणी राहतात .बाळ पळून नेणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचे नाव सुनिता अशोक काळे ती नाशिक रोड रेल्वे स्थानकावर फिरस्ती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. एकूणच या चाणाक्ष, प्रसंगावधानी पोलिसिंगमुळे एका चिमुकलीचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचले.