म.न.पा शाळेत एक अनोखा उपक्रम; सिन्नर फाटा शाळेत दफ्तर मुक्त शनिवारी विद्यार्थ्यांनी बनवली भाजी भाकरी
म.न.पा शाळेत एक अनोखा उपक्रम;
सिन्नर फाटा शाळेत दफ्तर मुक्त शनिवारी विद्यार्थ्यांनी बनवली भाजी भाकरी
नाशिक रोड प्रतिनिधी
म. न. पा शाळा क्रमांक 51, सिन्नर फाटा, नाशिक रोड येथे दप्त मुक्त शनिवार या उपक्रमात एक अनोखा उपक्रम घेण्यात आला. आणि तो उपक्रम म्हणजे माझी भाजी ,माझी भाकरी. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे कोणत्याही गोष्टीत आपण स्वावलंबी होणे,स्वतःचे काम स्वतः करणे म्हणजेआयुष्यात कोणतीही अडचण येत नाही. स्वतःच्या हाताने भाजी व भाकरी करणार आहे या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता. विद्यार्थ्यांनी भाजी व भाकरी बनवण्याचे स्वतः साहित्य आणले होते. विद्यार्थ्यांना जी भाजी करायची होती तो भाजीपाला स्वतः विद्यार्थी बाजारात जाऊन घेऊन आले. विद्यार्थ्यांना अशावेळी भाज्यां ह्या किती पाव,किती अर्धा किलो, किती किलो याची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांनी स्वतः भाजी व भाकरी केल्यामुळे एक वेगळाच आनंद निर्माण झाला होता. त्यांनी बनवलेल्या भाजी व भाकरीची चव प्रत्येकाने घेतली. शिक्षक चंद्रकांत गायकवाड, राजेंद्र परदेशी, सुनील बोंडे, चिंतामण साबळे, मोतीलाल गायकवाड, निर्मला दिवटे यांनी विद्यार्थ्यांना फ्लावरची भाजी करून दाखवली. भाजीचा सर्व सामान शिक्षक राहुल कोळी यांनी उपलब्ध करून दिला होता. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या स्वतः भाजी व भाकरीचे कौतुक शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाळुंज यांनी केले.