डॉ. प्रमोद चौधरींच्या खासगी प्रॅक्टिसची चौकशी होणार, पण इतरांचे काय?
डॉ. प्रमोद चौधरींच्या खासगी प्रॅक्टिसची चौकशी होणार, पण इतरांचे काय?
नाशिक प्रतिनिधी
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी व्यवसाय करण्यास मनाई असून त्या बदल्यात त्यांना ३५ टक्के अतिरिक्त भत्ता देण्याची तरतूद आहे. हा ३५ टक्के अतिरिक्त भत्ता लाटून काही चालाख वैद्यकीय अधिकारी खासगी वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. ही बाब जिल्हा रुग्णालय प्रशासनाला देखील ज्ञात आहे. तथापी प्रशासन आणि हे वैद्यकीय अधिकारी यांची मिलिजुली असल्याने त्या तक्रारी केराच्या टोपलीत टाकल्या जातात. तथापी जिल्हा शासकीय रुग्णालयात सेवारत असलेले वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद चौधरी यांची खासगी व्यवसाय करीत असल्याचे पुरावे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अनिल भडांगे यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला सादर करून चौकशी पश्चात कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती गठीत करून चौकशीला प्रारंभ केला आहे.
चौकशी समितीचे अध्यक्ष डॉ. संदीप सूर्यवंशी यांनी या संदर्भात खासगी प्रॅक्टिस करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद चौधरी आणि तक्रारदार अनिल भडांगे यांना या चौकशीच्या संबंधाने पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की,शासनाच्या परिपत्रकानुसार शासकिय सेवेत काम करणा-या डॉक्टरांना खाजगी प्रक्टिस करु नये याकरिता पगारा व्यतिरिक्त ३५ टक्के अतिरिक्त भत्ता दिला जातो व संबंधीत डॉक्टराकडून दर महिन्याला मी प्रायव्हेट प्रैक्टिस करणार नाही असे प्रमाणपत्र भरुन घेतले जात असते. डॉ चौधरी हे प्रायव्हेट प्रैक्टिस करतात तसेच शासकिय अतिरिक्त भत्ता घेतात अशी तक्रार अनिल कोंडाजी भंडागे, प्रहार, जिल्हाप्रमुख नाशिक यांनी संदर्भीय पत्रान्वये केलेली आहे.डॉ. प्रमोद चौधरी, वैदयकिय अधिकारी श्रीरोगतज्ञ जिल्हा रुग्णालय नाशिक यांनी २ तारखेला दिलेल्या मुलाखती संबंधात व त्याच्या खाजगी दवाखान्या बाबत तसचे डॉ चौधरी हे प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असले बाबत खुलासा २ दिवसाच्या आत चौकशी समिती समोर सादर करावा खुलासा वेळेत प्राप्त न झाल्यास आपल्या विरुध्द प्रशासकिय कारवाई प्रस्तावीत करण्यात येईल.
डॉ. प्रमोद चौधरी यांची मुलाखत खासगी वृत्त वाहिनीवर प्रसिद्ध झाली म्हणून तक्रार झाली, चौकशी समिती नियुक्त होऊन खुलासाही मागितला गेला. एरवी जिल्हा शासकीय रुग्णालयात सेवा देऊन ३५ टक्के अतिरिक्त भत्ता घेणारे आणखी काही प्रतिज्ञापत्र धारक वैद्यकीय अधिकारी राजरोस खासगी व्यवसाय करीत आहेत. अनेक मोठ्या रुग्णालयात वैद्यकीय पॅनलवर किंवा गेस्ट पॅनलवर आहेत. ही बाब शासकीय रुग्णालय प्रशासन, चौकशी समिती आणि तक्रारदारांनाही ज्ञात आहे. त्यांचीही चौकशी होणे क्रमप्राप्त आहे. त्यांची चौकशी झाली तर केवळ डॉ. चौधरी यांनाच लक्ष्य करून आकस दाखवला, असा आरोप होणार नाही.